2024 Mumbai Konkan Assembly Election Result Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. तर मुंबईत ५५ टक्के मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडलं, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे आपण मुंबई, ठाण्यासह कोकणातील विधानसभा मतदारसंघाचे अपडेट्स, निवडणुकीचा निकाल जाणून घेणार आहोत. मुंबई-कोकणात प्रामुख्याने शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) या दोन पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबईसह कोकणातील जनता खरी शिवसेना कोणाची याचा कौल देणार आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष येथील मतदारसंघांवर असेल.

Live Updates

Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.

03:08 (IST) 23 Nov 2024

Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : ठाणे-कोकणातील जनता खऱ्या शिवसेनेचा निर्णय घेणार?

ठाण्यात सात व कोकणातील आठ मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होणार आहे.

02:03 (IST) 23 Nov 2024

Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : शिवसेना विरुद्ध शिवसेना

मुंबई महानगर प्रदेशात १९ जागांवर आणि एकट्या मुंबईत १२ मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होणार आहे.

01:06 (IST) 23 Nov 2024

Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण चर्चेत

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. कोकणातील निवडणुकीवर या प्रकरणाचा प्रभाव दिसू शकतो.

00:02 (IST) 23 Nov 2024

Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

मुंबईसह ठाणे-कोकणात एकूण पाच मंत्री असून विधानसभा निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

एकनाथ शिंदे - कोपरी-पाचपाखाडी (ठाणे)

उदय सामंत - रत्नागिरी (रत्नागिरी)

रवींद्र चव्हाण - डोंबिवली (ठाणे)

दीपक केसरकर - सावंतवाड (रत्नागिरी)

मंगलप्रभात लोढा - मलबार हिल (मुंबई)

22:44 (IST) 22 Nov 2024

Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : कोकणातील मतदारसंघांवर सर्वांच लक्ष

मुंबईमध्ये एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. ठाण्यात १८, पालघरमध्ये सहा, रायगडमध्ये सात, रत्नागिरीत पाच, सिधुदूर्गमध्ये तीन मतदारसंघ आहेत.

22:24 (IST) 22 Nov 2024

Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : मुंबई, ठाण्यासह कोकणात एकूण ७३ मतदारसंघ

मुंबई व ठाण्यासह कोकणात एकूण ७३ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत.