2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला मिळालेल्या जागा
भाजपा – ३१
शिवसेना (शिंदे) – १९
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४
एकूण – ५४
मुंबईसह ठाणे कोकणात महाविकास आघाडीला मिळालेल्या जागा
काँग्रेस – ३
शिवसेना (ठाकरे) – ११
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १
समाजवादी पार्टी – २
एकूण – १७
माकप – १
Mumbai Vidhan Sabha Result Live : यामिनी जाधव यांचा पराभव
दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविलेल्या यामिनी जाधव यांचा पराभव झाल्याने त्यांनी भायखळा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पुन्हा ३१,३६१ मतांनी पराभव झाला.
Mumbai Vidhan Sabha Result Live : मागाठाणेतून प्रकाश सुर्वे, तर कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर निवडून आले
मागाठाणेतून प्रकाश सुर्वे यांना ५८ हजाराचे मोठे मताधिक्य मिळाले, तर कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर निवडून आले.
Mumbai Vidhan Sabha Result Live Updates : प्रमुख पराभूत उमेदवार
●नवाब मलिक (मानखुर्द – राष्ट्रवादी अ.प.)
●यामिनी जाधव (भायखळा – शिवसेना शिंदे गट)
●बाळा नांदगावकर (शिवडी – मनसे)
●अमित ठाकरे (माहिम – मनसे)
●मिलिंद देवरा (वरळी – शिवसेना शिंदे गट)
Mumbai Konkan Vidhan Sabha Live Updates : प्रमुख विजयी उमेदवार
प्रमुख विजयी उमेदवार
●राहुल नार्वेकर (कुलाबा – भाजप)
●आदित्य ठाकरे (वरळी – शिवसेना ठाकरे गट)
●कालिदास कोळंबकर ( वडाळा – भाजप)
●प्रकाश सुर्वे (मागाठाणे – शिवसेना शिंदे गट)
●मंगलप्रभात लोढा (मलबार हिल – भाजप)
●अजय चौधरी (शिवडी – शिवसेना ठाकरे गट)
●अबु आझमी (मानखुर्द – सपा)
Mumbai Vidhan Sabha Result Live Updates : दिलीप लांडे यांचा मोठा विजय
गेल्या निवडणुकीत ५०० हून कमी मतांनी विजयी झालेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार दिलीप लांडे यांनी यंदा मात्र चांदिवली मतदारसंघातून २०,६२५ मताधिक्य घेत मोठा विजय मिळविला.
Mumbai Vidhan Sabha Result Live Updates Nawab Malik : नवाब मलिक पराभूत, पण कन्या विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मुंबईत एकाच मतदारसंघात विजय मिळाला असून अणुशक्तीनगरमधून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना ३,३७८ मतांनी विजय मिळाला. अजित पवार गटाला मुंबईत एकाच जागेवर विजय मिळाला. शिवाजीनगर-मानखुर्दमधून निवडणूक लढविलेल्या नवाब मलिक यांना केवळ १५,५०१ मते मिळाली आणि ३९,२७९ मतांनी त्यांचा पराभव झाला. कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंधांचा आरोप असलेले मलिक हे सध्या वैद्याकीय जामीनावर असताना त्यांनी ही निवडणूक लढविली होती. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे विजयी झाले.
VARUN SARDESAI – वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई विजयी
शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादीच्या(अजित पवार) झिशान सिद्दिकी यांचा पराभव केला आहे. सरदेसाई यांना ५७७०८ मतं मिळाली आहेत. तर सिद्दिकी यांना ४६,३४३ मतं मिळाली आहेत. मनसेच्या तृप्ती सावंतांना १८ हजार मतांवर समाधान मानावं लागलं.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उत्तर मुंबईत भाजपचेच वर्चस्व; सहापैकी पाच मतदारसंघ युतीकडे
भाजपचा बालेकिल्ला असलेला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतही भाजपने आपले वर्चस्व राखले. दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड या सहापैकी पाच मतदारसंघांत शिवसेना – भाजप महायुतीने विजय मिळविला. सविस्तर वाचा…
Raigad Election Results : रायगडात प्रस्थापितांनी मतदारसंघ राखले
रायगड जिल्ह्यात सातही मतदारसंघ प्रस्थापितांनी राखले आहेत. महायुतीचे सातही उमेदवार निवडून आले असून, महाविकास आघाडी मतदारांवर प्रभाव पाडण्यात निष्प्रभ ठरली आहे. कर्जत आणि उरण मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना झुंज द्यावी लागली, मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचे महेश बालदी आणि महेंद्र थोरवे विजयी झाले. सविस्तर वाचा…
गुहागर विधानसभेचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी राखला
गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या २ हजार ५९२ मतांनी निसटता पराभव झाला. आमदार भास्कर जाधव यांनी ७१ हजार २४१ मते घेऊन गुहागरचा गड राखण्यात यश मिळविले. सविस्तर वाचा
Rajapur Assembly Election Results 2024 : राजापुरात किरण सामंत यांचा विजय ; ठाकरे गटाचे राजन साळवी पराभूत
राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशा झालेल्या लढतीमध्ये तीन टर्म आमदार राहीलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांचा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी तब्बल १९ हजार ६८० मताधिक्क्याने पराभव केला. सविस्तर वाचा
मोठ्या मतफरकाने जिंकलेले मुंबईतील उमेदवार
मागाठाणे – प्रकाश सुर्वे – शिवसेना – ५८,१६४ मतांच्या फरकाने विजयी
दहिसर – मनिषा चौधरी – भाजपा – ४४,३२९ मतांच्या फरकाने विजयी
बोरिवली – संजय उपाध्याय – भाजपा – १,००,२५७ मतांच्या फरकाने विजयी
कांदिवली – अतुल भातखळकर – भाजपा ८३,५९३ मतांच्या फरकाने विजयी
चारकोप – योगेश सागर – भाजपा – ९१,१५४ मतांच्या फरकाने विजयी
मालाड (पश्चिम)- अस्लम शेख – 6,096 मतांच्या फरकाने विजयी
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा गड राखला
डोंबिवली – मागील १५ वर्ष डोंबिवली शहरावर आपली हुकमत कायम ठेवणाऱ्या भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यंदा चौथ्यांदा ७६ हजार ८९६ मताधिक्य मिळवून डोंबिवली शहरावरील स्वतासह भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. लोकसभा निवडणुकीपर्यंत एका व्यासपीठावर फिरणारे आणि एकमेकांचे गुणगान गाणारे महायुतीमधील मंत्री रवींद्र चव्हाण, माजी सभापती दीपेश म्हात्रे विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले.
Mumbai Konkan Assembly Election Results : मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला ३५ जागांवर आघाडी, तर मविआला केवळ १६ जागांवर आघाडी
मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला ३५ जागांवर आघाडी, तर मविआला केवळ १६ जागांवर आघाडी
मुंबई
महायुती २३, मविआ १२, इतर १
ठाणे-कोकण
महायुती ३२, मविआ ४, इतर ३

ठाणे जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा; १८ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे तर, केवळ दोनच जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजपने ९ पैकी ९, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ पैकी ६ जागा तर अजित पवार यांनी २ पैकी १ जागा जिंकली आहे. महाविकास आघाडीला दोनच जागा मिळाल्या असून ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही.
अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर चौथ्यांदा विजयी; ५१ हजार मतांनी ठाकरे गटाच्या वानखेडेंचा पराभव
अंबरनाथः अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे बालाजी किणीकर चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना किणीकरांनी धुळ चारली. पक्षांतर्गत कुरबुरी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रचारात नसलेला सक्रीय सहभाग यामुळे किणीकर यांना धक्का बसतो की काय अशी चर्चा असताना किणीकर यांनी ५२ हजार ३९२ इतक्या विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.
Jitendra Awhad: ईव्हीएमबाबत शासंकता; आमदार जितेंद्र आव्हाड
ठाणे : आमच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. मला पूर्वीपासून ईव्हीएमबाबत शासंकता होती आताही शासंकता आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. विजयी झाल्यानंतर त्यांनी ईव्हीएम यंत्राबाबत वक्तव्य केले.मुंब्रा मतदार संघात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे नजीब मुल्ला निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुमारे एक लाख मतांनी विजय मिळविला आहे.
Chiplun Election Result 2024 : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांनी गड राखला; प्रशांत यादव यांचा पराभव
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा विजय झाला. महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी त्यांना कडवी झुंज दिली. चिपळूण तालुक्यात दोन्ही उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. सविस्तर वाचा
Kopri Pachpakhadi Constituency: कोपरी पाचपाखाडीतुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजयी
ठाणे – कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १ लाख ५९ हजार ६० मतांनी विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे हे पहिल्या फेरी पासून मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर फटाके फोडून जल्लोष करायला सुरुवात केली होती.
पनवेल – २५ वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,८१,२००
बाळाराम पाटील – १,३०,२१२
लीना गरड – ४३,४०७
ठाकूर ५०,९८८ मतांची आघाडी
Maharashtra Assembly Election Results 2024 : बेलापूर मतदारसंघातील फेर मतमोजणीची मागणी केली आहे. माझी मागणी मान्य न झाल्यास कोर्टात दाद मागणार.. -संदीप नाईक
पनवेल – २५ वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,८१,२००
बाळाराम पाटील – १,३०,२१२
लीना गरड – ४३,४०७
ठाकूर ५०,९८८ मतांची आघाडी
पनवेल – २४ फेरी
प्रशांत ठाकूर – १,७३,९३५
बाळाराम पाटील – १,२३,२०१
लीना गरड – ४२,९५४
भाजपचे प्रशांत ठाकूर ५०,७३४ मतांनी आघाडीवर
ऐरोली विधान सभा गणेश नाईक विजयी
३२ वी फेरी अखेर एकूण मतदान
गणेश नाईक -भाजप १४२२७३
विजय चौगुले अपक्ष ५१८६२
एम के मढवी ३७७६२
निलेश बांणखिले १६७२५
अंकुश कदम स्वराज्य ८६१२
गणेश नाईक विजयी ९९ हजार ४११ मतांनी विजयी
पनवेल – २२ वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,५७,८०८
बाळाराम पाटील – १,०९,३०२
लीना गरड – ४१,५१८
भाजपचे प्रशांत ठाकूर हे ४८,५०६ मतांनी आघाडीवर
मुंबईसह ठाण्यातील शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवारांची स्थिती
पालघर- राजेंद्र धेड्या गावित -विजयी
बोईसर -विलास सुकुर तरे – विजयी
अबंरनाथ- बालाजी प्रल्हाद किणीकर- आघाडीवर
कल्याण ग्रामीण -राजेश गोवर्धन मोरे- आघाडीवर
ओवळा माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक – विजयी
कोपरी पाचपाखडी -एकनाथ संभाजी शिंदे- विजयी
मागाठाणे -प्रकाश राजाराम सुर्वे -विजयी
विक्रोळी -सुवर्णा सहदेव करंजे -आघाडीवर
भांडुप पश्चिम -अशोक धर्मराज पाटील -आघाडीवर
जोगेश्वरी पूर्व -मनिषा रविंद्र वायकर- विजयी
दिंडोशी -संजय ब्रिजकिशोर निरुपम- पराभूत
अंधेरी पूर्व- मूरजी कांनजी पटेल- विजयी
चांदिवली -दिलीप भाऊसाहेब लांडे -विजयी
मानखुर्द शिवाजीनगर- सुरेश पाटील -पराभूत
अणुशक्ती नगर -अविनाश राणे -पराभूत
चेंबूर- तुकाराम रामकृष्ण काते – विजयी
कुर्ला -मंगेश अनंत कुडाळकर (अजा)- विजयी
धारावी -राजेश खंदारे- पराभूत
माहिम -सदा (सदानंद) सरवणकर -पराभूत
वरळी – मिलींद मुरली देवरा- पराभूत
भायखळा- यामिनी यशवंत जाधव- विजयी
मुंबादेवी- शायना मनिष चुडासामा मुनोट- पराभूत
कर्जत- महेंद्र सदाशिव थोरवे- विजयी
अलिबाग- महेंद्र हरी दळवी विजयी-
महाड- भरतशेठ मारुती गोगावले- विजयी
लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करू; संजय केळकर, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
ठाणे – विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत, मला विजयी केले. त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी दिले. विधानसभा ठाणे शहर मतदारसंघात ७४ हजाराहून अधिक मतांची मिळाली असून विजय निश्चित असल्याने केळकर त्यांच्या काऱ्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू होता त्यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचा
मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले; पहिल्याच भाषणात विरोधकांना इशारा
बदलापूरः माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रूपाने स्वपक्षिय छुपे आव्हान आणि महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची नाराजीतून प्रचारातून माघार यामुळे कधी नव्हे ते आव्हानात्मक झालेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे ५७ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.