2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडलं, हे आज समजेल. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये मविआपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या. अपक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : शायना एनसी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
#WATCH | Shiv Sena candidate from Mumba Devi assembly constituency, Shaina NC visits Shree Siddhivinayak Temple, in Mumbai to offer prayers ahead of counting for #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/Ewo2I3opMX
— ANI (@ANI) November 23, 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची सत्ता
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत झाली आहे. अनेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यात महायुतीची सत्ता येील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही एक्झिट पोल्समधून मविआच्या बाजूने कल दर्शवला आहे. त्रिशंकू स्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : मतमोजणीपूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांची तयारी
मुंबईतील दादर येथील डी सिल्वा हायस्कूलमध्ये शनिवारी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सुरुवात करण्यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. (PC : Express Photo By Ganesh Shirsekar)
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
दिड तासांनी मतमोजणीला सुरुवात होईल, दुपारपर्यंत जनतेचा कल लक्षात येईल.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात
कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : महायुतीचं कोकणावर लक्ष
लोकसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाड्यातून अपयश येत असताना महायुतीला कोकणाने साथ दिली. त्याच पाठिंब्याची आस घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना ठाकरे गटाने कोकणवासीयांना भावनिक साद घालून प्रचारात रंग भरला.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : निलेश राणेंची प्रतिष्ठा पणाला
मागील विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. यावेळी राणे यांचे थोरले पुत्र निलेश राणे शिवसेनेच्या (शिंदे) तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांना आव्हान दिलं आहे.
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : ठाणे-कोकणातील जनता खऱ्या शिवसेनेचा निर्णय घेणार?
ठाण्यात सात व कोकणातील आठ मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होणार आहे.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : शिवसेना विरुद्ध शिवसेना
मुंबई महानगर प्रदेशात १९ जागांवर आणि एकट्या मुंबईत १२ मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होणार आहे.
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण चर्चेत
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. कोकणातील निवडणुकीवर या प्रकरणाचा प्रभाव दिसू शकतो.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईसह ठाणे-कोकणात एकूण पाच मंत्री असून विधानसभा निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एकनाथ शिंदे – कोपरी-पाचपाखाडी (ठाणे)
उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)
रवींद्र चव्हाण – डोंबिवली (ठाणे)
दीपक केसरकर – सावंतवाड (रत्नागिरी)
मंगलप्रभात लोढा – मलबार हिल (मुंबई)
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : कोकणातील मतदारसंघांवर सर्वांच लक्ष
मुंबईमध्ये एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. ठाण्यात १८, पालघरमध्ये सहा, रायगडमध्ये सात, रत्नागिरीत पाच, सिधुदूर्गमध्ये तीन मतदारसंघ आहेत.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : मुंबई, ठाण्यासह कोकणात एकूण ७३ मतदारसंघ
मुंबई व ठाण्यासह कोकणात एकूण ७३ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत.