Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. सहापैकी चार जागांवरील विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून दोघांच्या विजयाच्या घोषणेची प्रतिक्षा आहे. जिंकलेल्या चार मतदारसंघात दोघेजण ठाकरे गटाचे असून भाजपा अन् शिंदे गटातून प्रत्येकी एकजण निवडून आला आहे.

मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार या सहाही जागांवर अटीतटीची लढत झाली असल्याने कोणालाच स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या सहा जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यामुळे या सहा जागांवर कोणाचं सर्वाधिक वर्चस्व राहतंय यावरच आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल अवलंबून असल्याचंही बोललं जातंय.

हेही वाचा >> Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? पहिला कल हाती; लोकसभा निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य, इशान्य मुंबई, ठाणे आणि कल्याण या सहा मतदारसंघांमध्ये थेट ठाकरे सेना विरुद्ध शिंदेसेना अशी लढत आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळीही या जागा शिवसेनेच्याच राहतील. फक्त कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात सर्वाधिक जागा जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा >> 2024 Lok Sabha Election Result Live Updates : अटीतटीची लढत, प्रतिष्ठा पणाला; सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये कोण मारणार बाजी?

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई, ठाणे, कल्याण आणि भिवंडी आदी मतदारसंघांतील घडामोडी, आघाडी, पिछाडी, विजयाचा जल्लोष, क्रिया-प्रतिक्रिया वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

Live Updates

2024 Mumbai Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मुंबईसह आजूबाजूच्या मतदारसंघातील घडामोडी जाणून घ्या

21:07 (IST) 4 Jun 2024
Mumbai Loksabha Live Result update : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!

मुंबईत दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांचा विजय घोषित करण्यात आला आहे. तर, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. तसंच, अटीतटीच्या ठरलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंगात शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केलंय. फक्त मुंबई उत्तर मतदासंघातून भाजपाचे पियूष गोयल आणि दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे.

20:54 (IST) 4 Jun 2024
अजित पवार गटाच्या उमेदवाराला फक्त २०१ मतं, लाजिरवाणा पराभव

बारामती आणि शिरूरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला तर लक्षद्विपमध्ये दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. मात्र अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ २०१ मतं मिळाल्यामुळे त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. सविस्तर बातमी वाचा

20:53 (IST) 4 Jun 2024
“मविआचे १८ खासदार जिंकले, तर राजकारणातून संन्यास घेईल”, आशिष शेलार

महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आज लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल अगदी उलटे लागल्याचे दिसते. महायुती १८ ते १९ जागांवर मर्यादीत राहिली असून महाविकास आघाडीने २९ ते ३० जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाकडून आता आशिष शेलार यांना डिवचण्यात येत आहे. सविस्तर बातमी वाचा

20:45 (IST) 4 Jun 2024
“अपयशाने खचू नका, नव्या उमेदीने लोकसेवेला वाहून घ्या”, लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती आली नसली तरीही आकडेवारीनुसार कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे याचा अंदाज लावता येत आहे. त्यानुसार, अजित पवार गटाला केवळ एकच जागा मिळाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल गिते यांचा पराभव केलाय. परंतु, हा मतदारसंघ वगळता इतर तिन्ही मतदारसंघात अजित पवार गटाचा दारूण पराभव झाला आहे. अटीतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

सविस्तर वृत्त वाचा

20:03 (IST) 4 Jun 2024
Mumbai North West Loksabha Live Result : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ट्विस्ट, किर्तीकरांवर मात करत रवींद्र वायकरांचा विजय

शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या मागणीवरून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात पुन्हा मत मोजणी करण्यात आली. यावेळी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेऱ्या आणि टपाली बाद ठरवलेल्या मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. त्यानुसार, अमोल गाजनान किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते, तर रवींद्र वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली आहेत.

19:51 (IST) 4 Jun 2024
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ट्विस्ट, रवींद्र वायकरांच्या मागणीवरून पुन्ह मतमोजणी!

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. परंतु, शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पुनर्मोजणीची मागणी केली. त्यानुसार, तिथं पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बाद झालेल्या ११ टपाली मतांची पुनर्पडताळणी करण्यात येत आहे.

17:14 (IST) 4 Jun 2024
विजयी उत्सव साजरा होणार; शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन

नवी मुंबई -महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांचा भारी मताधिक्याने दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज संध्याकाळी ७: ०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर १८ नेरुळ विजय माने यांच्या कार्यालया समोर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे साहेब, शिवसेना नवी मुंबई संपर्कप्रमुख , किशोर पाटकर साहेब,आरपीआय नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे साहेब,भाजपाचे अध्यक्ष रामचंद्र घरत , महानगर प्रमुख अशोक गावडे , महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील इत्यादी उपस्थित राहणार आहेत. याचप्रमाणे वाशी येथेही भाजपच्या कार्यर्त्यांसमवेत विजय साजरा करण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील यशाबद्दलही विविध राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

17:10 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 Live : मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड विजयी, साडेचार हजारांच्या फरकाने निकमांचा पराभव

मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. अवघ्या साडेचार हजारांच्या फरकाने त्यांनी भाजपाच्या उज्ज्वल निकम यांना हरवलंय. सकाळपासून उज्ज्वल निकमांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता होती. परंतु, शेवटच्या टप्प्यांत वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली.

14:28 (IST) 4 Jun 2024
Mumbai Lok Sabha Election Result 2024 : शिंदे गटाला टफ फाईट देत ठाकरेंचे सर्व शिलेदार मुंबईच्या जागांवर आघाडीवर, चुरशीच्या लढतीत उबाठाची मात!

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जातेय. मतमोजणीदरम्यान होणाऱ्या आकडेवारीचा आलेख कमी जास्त होत असला तरीही दुपारच्या सत्रात आता चित्र जवळपास स्पष्ट होतंय. मुंबईतील सहा मतदारसंघ हे दोन्ही शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची चांगली कामगिरी दिसू येतेय.

सविस्तर वृत्त वाचा

14:22 (IST) 4 Jun 2024
Thane Lok Sabha Election Result 2024 Live : नवी मुंबईत जल्लोष सुरू

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणूक  मतमोजणी सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी एक लाखांच्या पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली असल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे यांच्या कार्यालय बाहेर जल्लोष सुरू झाला आहे. म्हस्के यांना मिळालेली आघाडी ही निर्णायक  आहे. त्यांचा विजय केवळ औपचारिकता राहिली आहे अशी प्रतिक्रिया खरे यांनी दिली आहे.

कल्याण डॉ श्रीकांत शिंदे आणि ठाणे येथे नरेश म्हस्के यांच्या निर्णायक आघाडीने या प्रतिष्ठित निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली असल्याने नवी मुंबईत शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. घोषणा होताच जोरदार जल्लोषाच्या तयारीत शिंदे गट सज्ज होत

13:21 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं? देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची स्थिती काय?

उत्तर प्रदेशमध्ये यंदादेखील भाजपाचं वर्चस्व असेल असा दावा अनेक एक्झिट पोल्समध्ये करण्यात आला होता. हे राज्य गेल्या १० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ६२ जागा जिंकल्या होत्या. यावर्षी भाजपाला ६० ते ७५ जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत हाती आलेले निकाल हे एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा वेगळे आहेत.

सविस्तर वाचा

13:05 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result Live : ठाणे, कल्याणमध्ये शिंदे गटाची आघाडी, तर भिवंडीत राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे

ठाणे लोकसभा

नरेश म्हस्के : २९२३७२

राजन विचारे : १९०५५९

लीड : १०१८१३ (नरेश म्हस्के)

कल्याण लोकसभा

श्रीकांत शिंदे : २४९५१४

वैशाली दरेकर : १२७०३८

लीड : १२२४७६(श्रीकांत शिंदे)

भिवंडी लोकसभा

बाळ्या मामा म्हात्रे : १३५२१६

कपिल पाटील : ११२५२३

निलेश सांभरे : ८०१६७

लीड : २२६९३ (बाळ्या मामा)

12:18 (IST) 4 Jun 2024
Mumbai Lok Sabha Election Result 2024 Live : मुंबईत ठाकरे गटाचे सर्व शिलेदार आघाडीवर, शिंदे गटाला कडवी लढत

मुंबईतील चार जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना १ लाख ४० हजार ८७८ मते मिळाली असून शिंदे गटाचे रविंद्र वायकर अवघ्या १ हजार मतांनी मागे आहेत.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना मागे पाडलं आहे. संजय पाटील यांना १ लाख ७२ हजार ९१४ मते आतापर्यंत मिळाली असून मिहिर कोटेचा ३ हजार १२५ मतांनी मागे आहेत.

मुंबई दक्षिण विभागातून अरविंद सावंत यांना १ लाख २५ हजार ५९८ मते मिळाली असून शिंदे सेनेच्या यामिनी जाधव ३६ हजार ०२८ मतांनी मागे आहेत.

तर, दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना १ लाख ९९ हजार ७७ मते मिळाली असून शिंदे गटाचे विद्यमान खासदार १५ हजार मतांनी मागे आहेत.

11:18 (IST) 4 Jun 2024
Thane and Kalyan Loksabha Election Results Live Updates : ठाणे, कल्याणमध्ये शिंदे गट आघाडीवर

ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के ४० हजार ३२५ मतांनी आघाडीवर

कल्याण लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान

वैशाली दरेकर १४ हजार ५८३

श्रीकांत शिंदे २५ हजार ८६१

नोटा ५४०

10:50 (IST) 4 Jun 2024
Thane Lok Sabha Election Result Live Updates : नरेश म्हस्केंनी घेतली २९ हजारांनी आघाडी

ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के २९ हजार ८६७ मतांनी आघाडीवर

10:41 (IST) 4 Jun 2024
Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates : सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटलांवर आघाडी

भिवंडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे १११८ मतांनी आघाडीवर.

10:35 (IST) 4 Jun 2024
Kalyan Lok Sabha Election Result Live Updates : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ पहिली फेरी

वैशाली दरेकर २९५०

श्रीकांत शिंदे ५०४३

एकूण मते ८२५७

-----

कल्याण ग्रामीण

वैशाली दरेकर १८१७

श्रीकांत शिंदे ४३७९

एकूण ६५६८

10:18 (IST) 4 Jun 2024
Mumbai South Central Lok Sabha Election Result Live Updates : मातोश्रीच्या अंगणात अनिल देसाईंची आघाडी

दक्षिण मध्य मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल देसाई य़ांनी आघाडी घेतली असून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना अवघ्या १५३ मतांनी मागे टाकलं आहे.

10:15 (IST) 4 Jun 2024
Mumbai South Lok Sabha Election Result Live Updates : यामिनी जाधवांवर मात करत अरविंद सावंत यांची आघाडी

मुंबईतील दक्षिण मतदारसंघात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी लढत आहे. या लढतीत यामिनी जाधव मागे पडल्या असून अरविंद सावंत आघाडीवर आहेत.

10:14 (IST) 4 Jun 2024
Mumbai North West Lok Sabha Election Result Live Updates : ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पिछाडीवर, रवींद्र वायकरांनी घेतली आघाडी

अटतटीच्या ठरलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना अमोल किर्तीकरांपेक्षा २ हजारांनी अधिक मते मिळाली आहेत.

10:11 (IST) 4 Jun 2024
Mumbai North East Lok Sabha Election Result Live Updates : ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांची आघाडी

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

10:09 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Central Lok Sabha Election Result Live Updates : उज्ज्वल निकमांची ११ हजारांनी भरारी

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंगात उज्ज्वल निकम यांनी आघाडी घेतली आहे. तर वर्षा गायकवाड ११ हजारांनी मागे आहेत.

10:06 (IST) 4 Jun 2024
North Mumbai Lok Sabha Election Result Live Updates : उत्तर मुंबईतून पियूष गोयल आघाडीवर, काँग्रेसचे भूषण पाटील २२ हजार मतांनी मागे

उत्तर मुंबईतून पियूष गोयल यांनी आघाडी घेतली असून ४२ हजार ५८६ मते त्यांना आतापर्यंत पडली आहेत.

10:01 (IST) 4 Jun 2024
Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates : भिवंडीत कपिल पाटील आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर

भिवंडीतील भाजपाचे उमेदवार कपिल पाटील २७६६ मतांनी आघाडीवर आहेत. कपिल पाटील ९८३९ मते, अपक्ष निलेश सांबरे ७१६८, राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे ६८६२ मते मिळाली आहेत.

09:59 (IST) 4 Jun 2024
Thane Lok Sabha Election Result Live Updates : राजन विचारेंची आघाडी कायम, निर्णयाकडे ठाणेकरांचं लक्ष

ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के १० हजार १७३ मतांनी आघाडीवर. राजन विचारे सुरुवातीपासून पिछाडीवर.

09:09 (IST) 4 Jun 2024
Kalyan Lok Sabha Election Result Live Updates | कल्याण लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट | कल्याणमध्ये ३६१३ मतपत्रिकांची मोजणी सुरू

कल्याण लोकसभा मतदारसंघातील टपाली ३६१३ मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. यामध्ये २३१ मतपत्रिका सैन्य दलाकडून प्राप्त झाले आहेत. सरकारी आस्थापन मध्ये काम करणाऱ्या ३३८२ कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे.

09:00 (IST) 4 Jun 2024
Thane Lok Sabha Election Result Live Updates : ठाणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट | ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्केंची आघाडी

ठाण्यातून नरेश म्हस्के पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यावर मात करून नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली आहे. नरेश म्हस्के १४४८ मतांनी आघाडीवर आहेत. नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेचे माजी महापौर असून शिवसेनेत फूट पडल्यानतंर ते शिंदे गटात गेले.

08:21 (IST) 4 Jun 2024
Mumbai Election Result Live Updates | मुंबई लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट | मुंबईत संभ्रमाचं वातावरण; वर्षा गायकवाड, अमोल किर्तीकर, अरविंद सावंत आघाडीवर; पियुष गोयलही पुढे!

दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्या तरी मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात संभ्रमाचं वातावरण आहे.

https://twitter.com/ANI/status/1797723473617523102

08:10 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-उत्तर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पियुष गोयल आघाडीवर, भाजपाची सकारात्मक सुरुवात

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर आहेत. यांच्याविरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांची लढत आहे. पियुष गोयल हे राज्यसभेचे विद्यमान खासदार असून केंद्रीय मंत्रीही आहे. पियुष गोयल हे पहिल्यांदाच थेट सार्वत्रिक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात सर्वांचं लक्ष आहे.

07:45 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Central Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-उत्तर-मध्य लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट | मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच उज्ज्वल निकम यांचा व्यायाम

मतमोजणीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. परंतु, त्याआधीच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी आज पहाटेच व्यायामाला सुरुवात केली.

CM Eknath Shinde To Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

 

2024 Mumbai Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मुंबईसह आजूबाजूच्या मतदारसंघातील घडामोडी जाणून घ्या

Story img Loader