Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. सहापैकी चार जागांवरील विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून दोघांच्या विजयाच्या घोषणेची प्रतिक्षा आहे. जिंकलेल्या चार मतदारसंघात दोघेजण ठाकरे गटाचे असून भाजपा अन् शिंदे गटातून प्रत्येकी एकजण निवडून आला आहे.
मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार या सहाही जागांवर अटीतटीची लढत झाली असल्याने कोणालाच स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या सहा जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यामुळे या सहा जागांवर कोणाचं सर्वाधिक वर्चस्व राहतंय यावरच आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल अवलंबून असल्याचंही बोललं जातंय.
मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य, इशान्य मुंबई, ठाणे आणि कल्याण या सहा मतदारसंघांमध्ये थेट ठाकरे सेना विरुद्ध शिंदेसेना अशी लढत आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळीही या जागा शिवसेनेच्याच राहतील. फक्त कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात सर्वाधिक जागा जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई, ठाणे, कल्याण आणि भिवंडी आदी मतदारसंघांतील घडामोडी, आघाडी, पिछाडी, विजयाचा जल्लोष, क्रिया-प्रतिक्रिया वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.
2024 Mumbai Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मुंबईसह आजूबाजूच्या मतदारसंघातील घडामोडी जाणून घ्या
वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मराठी आणि मुस्लीम मतदारांचा म्हणून ओळखला जातो. येथे मराठी ३४ टक्के आणि मुस्लीम २४ टक्के मतदार आहेत. या वेळी पाचव्या टप्प्याचे मुंबईतील मतदान सर्वत्र संथ पार पडले. या मतदारसंघात ५१.४२ टक्के मतदान नोंदले आहे. वर्षा गायकवाड या महिला उमेदवार असूनही येथे महिलांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.
माहिम, वडाळा, सायन कोळीवाडा, चेंबूर, आणि अणूशक्तीनगर या सहा विधानसभा मतदार संघाच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यात येथे लढत आहे. जवळपास पंधरा लाख मतदार संख्या (१४ लाख ५६ हजार ३३९) असलेल्या या मतदार संघात धारावी, दादर, वडाळा ह्या भागातील कष्टकरी, मध्यमवर्गीय मतदार उमेदवाराचे भवितव्य ठरवत असल्याचे यापूर्वीच्या निकालावरुन दिसून येते. अणूशक्तीनगर (नबाब मलिक, राष्ट्रवादी) चेंबूर ( प्रकाश फातर्फेकर, ठाकरे गट) सायन कोळीवाडा ( कॅप्टन तमिळ सेल्वन, भाजप) वडाळा ( कालिदास कोळंबकर, भाजप) धारावी (वर्षा गायकवाड, काँग्रेस) आणि माहिम (सदा सरवणकर, शिंदे गट) असे भाजपचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट, व ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगती तालीम असल्याने हे आमदार आपल्या मतदार संघात लोकसभा उमेदवाराला जास्तीत जास्त मतधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी आणि वरळी या सहा विधानसभा मतदारसंघांचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. या मतदारसंघात सहापैकी तीन शिवसेना, दोन भाजप आणि एक काँग्रेस असे आमदारांचे बलाबल होते. गुजराती, जैन, मारवडी मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने भाजपचा या मतदारसंघावर डोळा होता. परंतु, येथे दोन्ही मराठी उमेदवारांना संधी मिळाली आहे. ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत उभे आहेत, तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना संधी देण्यात आली.
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (ठाकरे गट) वि. यामिनी जाधव (शिंदे गट)
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिंदे गट) वि. अनिल देसाई (ठाकरे गट)
उत्तर मुंबई – पियुष गोयल (भाजपा) वि. भूषण पाटील (काँग्रेस)
वायव्य मुंबई – अमोल किर्तीकर (ठाकरे गट) वि. रविंद्र वायकर (शिंदे गट)
उत्तर मध्य मुंबई – उज्ज्वल निकम (भाजपा) वि. वर्षा गायकवाड (काँग्रेस)
ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा (भाजपा) वि. संजय दिना पाटील (ठाकरे गट)
ठाणे – राजन विचारे (ठाकरे गट) वि. नरेश म्हस्के (शिंदे गट)
कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) वि. वैशाली दरेकर (ठाकरे गट)
भिवंडी – कपिल पाटील (भाजपा) वि. बाळ्यामामा म्हात्रे (शरद पवार गट)
देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी होणार असून निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी तीन केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Maharashtra: Ahead of the Lok Sabha poll counting day, security has been heightened by the Mumbai Police
— ANI (@ANI) June 3, 2024
Security personnel are conducting intensive patrolling and checking at the Eastern Express Highway. pic.twitter.com/Y3FSlaqfVn