Mumbai Voter Turnout in Assembly Election 2024 : राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी बुधवारी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. या निवडणुकीत मुंबईकरांच्या मतदानाचा टक्का २०१९च्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळाले. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनुक्रमे ४९.०७ टक्के आणि ५१.९२ टक्के इतके मतदान नोंदवले गेले. यामध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघात शहरातील सर्वात कमी ४१.६४ टक्के मतदान झाले, तर बोरीवलीमध्ये सर्वाधिक ६०.५० टक्के मतदान झाले. त्यानंतर भांडुप पश्चिम विभाग दुसर्‍या क्रमांकावर राहिला. येथे ६०.१८ टक्के मतदान झाले.

लोकसभेला किती मतदान झालं होतं?

राज्यात झालेल्या सरासरी मतदानाच्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरात झालेले मतदान कमी असले तरी २०१९च्या निवडणुकीपेक्षा यंदा झालेले मतदान किंचित जास्त आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरीय जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ४८.२२ आणि ५१.२८ टक्के मतदान झाले होते. जवळपास सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ५२.३८ टक्के इतके मतदान झाले होते.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
BEST employees and passengers protest
बेस्ट कर्मचारी, प्रवाशांचे निषेध आंदोलन
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

निवडणूक आयोगाच्या अनेक प्रयत्नांनंतर देखील मुंबई शहर आणि उपनगर भागातील ३६ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमीच राहत आला आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीतही हाय प्रोफाईल कुलाबा मतदारसंघात ४०.१५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र येथे मतदानाची टक्केवारी काहीशी वाढली आहे.

अनेक मोहिमा राबवून, तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक प्रयत्न करूनही कुलाबा विधानसभा मतदारसंघ कमी मतदानासाठी ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत देखील कुलाबा भागात ४३.६८ टक्के इतके कमी मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात होते. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हीरा देवासी हे उमेदवार होते.

हेही वाचा >> राज्यात ६५.११ टक्के मतदान, ३० वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, ‘हा’ जिल्हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह

वरळी, माहीममध्ये किती मतदान?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भांडुप येथे ५६.१७ टक्के तर २०१४ च्या विधासभेवेळी ५५.३६ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाचे आकडे चांगलेच वाढले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली त्या वरळी मतदारसंघात ४७.५० टक्के मतदान झाले. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी त्यांची पहिली निवडणूक लढवली, त्या माहीम मतदारसंघात यंदा ५५.२३ टक्के मतदान झाले. भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा निवडणुकीच्या रिंगणात होते त्या मलबार हिल मतदारसंघात ५०.८ टक्के मतदान झाले. तर धारावी विधानसभा मतदारसंघात मतांची आकडेवारी ४६.१५ टक्के इतकी राहिली.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यांनुसार,मुंबईतील अंतिम मतदानाची टक्केवारी किमान पाच टक्क्यांनी वाढेल.

मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी १० हे मुंबई शहरात आहेत, तर उरलेले १६ हे उपनगरांमध्ये विखुरलेले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या या ३६ जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळाली. मुंबईतून अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि राजकीय कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात होते. आता २३ नोव्हेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीत जनतेने त्यांना स्वीकारलं की नाकारलं याचा फैसला होणार आहे.

Story img Loader