Muslim Candidates : महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. २३९ जागा जिंकून महाराष्ट्रात महायुतीने मैदान मारलं आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८ जागा आहेत त्यापैकी २३९ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात प्रचार जोरदार सुरु होता. काही घोषणाही देण्यात आल्या. यावरुन चर्चा होते आहे ती महाराष्ट्रात मुस्लीम उमेदवार ( Muslim Candidates ) किती निवडून आले, आपण जाणून घेऊ.

अबू आझमी मानखुर्दमधून विजयी

मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी ( Muslim Candidates ) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी एआयएमआयएमचे उमेदवार ( Muslim Candidates ) अतिक अहमद खान यांचा पराभव केला. अबू आझमी यांनी AIMIM उमेदवाराचा १२ हजार ७५३ मतांनी पराभव केला. आझमी यांना ५४ हजार ७८० मतं मिळाली. अतिक अहमद खान यांना ४२ हजार २७ मते मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार नवाब मलिक यांचा दारूण पराभव झाला. नवाब मलिक यांना केवळ १५ हजार ५०१ मतं मिळाली.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

हसन मुश्रीफ कागलमधून विजयी

कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (अजित गट) उमेदवार हसन मुश्रीफ यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ( Muslim Candidates ) राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार घाटगे समरजीत सिंह विक्रम सिंह यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव केला. मुश्रीफ हसन यांना १ लाख ४५ हजार २६९ मते मिळाली आहेत, तर घाटगे समरजितसिंह विक्रम सिंह यांना १३ लाख ३ हजार ६८८ मतं मिळाली आहेत.

रईस कासम शेख भिवंडीतून विजयी

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार ( Muslim Candidates ) रईस कासम शेख विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संतोष मंजे शेट्टी यांचा ५२ हजार १५ मतांनी पराभव केला. सपा उमेदवाराला १ लाख १९ हजार ६८७ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार ( Muslim Candidates ) संतोष मंजे शेट्टी यांना ६७ हजार ६७२ मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराला केवळ १ हजार ३ मतं मिळाली.

सना मलिक यांचा विजय

माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार सना मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद गट) उमेदवार आणि स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांचा ३ हजार ३७८ मतांनी पराभव केला. सना मलिक यांना ४९ हजार ३४१ मते मिळाली आहेत. तर फहाद अहमद ( Muslim Candidates ) यांना ४५ हजार ९६३ मतं मिळाली आहेत.

हारून खान वर्सोव्यातून विजयी

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे एकमेव मुस्लिम उमेदवार ( Muslim Candidates ) (उद्धव गट) हारून खान यांनी भाजप उमेदवार डॉ. भारती लवेकर यांचा १ हजार ६०० मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम उमेदवाराला ६५ हजार ३६ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भारती लवेकर यांना ६३ हजार ७९६ मतं मिळाली आहेत.

हे पण वाचा- Jammu and Kashmir Winner Losers List: भाजपाच्या खेळीमुळे चित्र बदलले; वाचा जम्मू-काश्मीर विधानसभेत किती मुस्लीम आणि हिंदू आमदार?

अस्लम शेख मालाडमधून विजयी

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अस्लम रंजनाली शेख यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार विनोद शेलार यांचा ६ हजार २२७ मतांनी पराभव केला आहे. अस्लम रंजनाली शेख यांना ९८ हजार २०२ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना ९१ हजार ९७५ मते मिळाली आहेत.

मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक मालेगावमधून विजयी

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार ( Muslim Candidates ) आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला.

साजिद खान पठाण अकोल्यातून विजयी

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण 1 हजार २८३ मतांनी विजयी झाले आहेत. साजिद खान यांना ८८ हजार ७१८ मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना ८७ हजार ४३५ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार हरीश रतनलाल अलीमचंदानी यांना २१ हजार ४८१ मतं मिळाली आहेत.

अमीन पटेल मुंबादेवीतून विजयी

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमीन पटेल यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा ३४ हजार ८८४ मतांनी पराभव केला आहे. शायना एनसी या भाजपच्या भक्कम नेत्या आहेत. जागावाटपात मुंबादेवीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. निवडणुकीपूर्वी शेवटच्या क्षणी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीटही मिळवलं.

अब्दुल सत्तार विजयी

सिल्लोड विधानसभा जागेवर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे उमेदवार सुरेश बनकर यांचा २४२० मतांनी पराभव केला. अब्दुल सत्तार यांना १ लाख ३७ हजार ९६० मते मिळाली. तर सुरेश बनकर यांना १ लाख ३५ हजार ५४० मतं मिळाली. महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणूक निकालांमध्ये १० मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत.

Story img Loader