MVA News : महाविकास आघाडीत बिघाडी ( MVA News ) होणार की काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे. याचं कारणही तसंच आहे. महाविकास आघाडीतला एक पक्ष बंड पुकारण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॉर्म्युला जाहीर केला. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), संजय राऊत (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष), नाना पटोले, काँग्रेस या तीन पक्षांनी हा फॉर्म्युला जाहीर केला. तसंच २७० जागांवर आमचं एकमत झाल्याचंही म्हटलं होतं. उर्वरित १८ जागा आम्ही मित्रपक्षांना देऊ असंही सांगितलं होतं. त्यानंतर आता महाविकास आघाडीतला एक पक्ष बंड पुकारण्याच्या तयारीत आहे.

नाना पटोले आणि संजय राऊत यांनी काय सांगितलं?

महाविकास आघाडीच्या ( MVA News ) तीन राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. ८५-८५-८५ या जागांवर मिळून एकूण २७० जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित १८ जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. लवकरच या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी ( MVA News ) म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं ( MVA News ) सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले. शरद पवार यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर मविआच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपासंदर्भातील घोषणा केली आहे. मविआ १८ जागा कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच अबू आझमी यांनी त्यांना २५ जागा मिळाल्या नाहीत तर वेगळं लढण्याचा निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे.

हे पण वाचा- Mahavikas Aghadi Seat Sharing : ‘मविआ’च्या जागावाटपात काँग्रेस आणि ठाकरे गटातील संघर्षात शरद पवारांनी कशी मारली बाजी?

अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

“मी शरद पवारांशी चर्चा केली. शरद पवारच योग्य नेते आहेत. कारण इतर दोन पक्षात दुसरं कुणीही त्यांच्या इतकं मोठं नाही. मी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. जर मला २५ जागा मिळाल्या तर ठीक कारण मला याआधी काँग्रेसने मला दोनवेळा दगा दिला आहे. एक दोन दिवस राहिले की दगा दिला जातो. मला एक दिवसाची वेळ दिली आहे. २६ तारखेला दुपारपर्यंत माझ्या पाच उमेदवारांची यादी आणि आणखी एक दोन जागा दिल्या तर ठीक अन्यथा मी २५ ते ३० उमेदवार जाहीर करेन आणि त्यांना स्वतंत्रपणे लढवेन. दिल्लीतले काँग्रेसचे नेते काय करत आहेत? इथले नेते दिल्लीत कशाला जातात? इथल्या नेत्यांना अधिकार द्यायचे नसतील तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना अध्यक्ष कशाला केलं आहे? मी सपाचा महाराष्ट्रातला अध्यक्ष आहे. माझ्याकडे एबी फॉर्म आहेत. मी ज्याला हवे त्याला ते देऊ शकतो. काँग्रेसला निर्णय घेता येत नाहीत म्हणूनच त्यांचा पराभव होतो” असा टोलाही अबू आझमी यांनी लगावला आहे.

तर महाविकास आघाडीत पहिली ठिणगी

अबू आझमी यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर त्यांनी स्वतंत्र उमेदवार देऊन लढण्याचा इशारा दिला आहे. तसं घडलं तर महाविकास आघाडीत ( MVA News ) पहिली ठिणगी पडेल यात काहीही शंका नाही.