महाराष्ट्रात सर्वात हायव्होल्टेज मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडलं आहे. या मतदानासाठी अजित पवार हे त्यांच्या आई आशाताई पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह आले होते. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अजित पवार हे आईसह आल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेबाबत आता अजित पवारांनी टीका करणाऱ्यांनाच प्रश्न केला आहे. मी जर आई बरोबर मतदान केलं तर तुमच्या पोटात का दुखलं? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे.

अजित पवारांचे बंधू श्रीनावास पवार यांचा आरोप काय होता?

अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आरोप केल्यापासूनच अजित पवारांच्या निर्णयावर त्यांच्या मातोश्री नाराज असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच अजित पवारांनी आई बरोबर मतदान केंद्र गाठल्यानं श्रीनिवास पवार यांना अजित पवारांनी उत्तर दिल्याचं बोललं जात होतं. अशातच आईबरोबर मतदान केल्यामुळे सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चांबाबत खंत व्यक्त केली. आज शिरुरमधील सभेत बोलताना माझ्या आईसह मतदानाला गेलो, तुमच्या का पोटात दुखलं? असा थेट सवाल अजित पवारांनी विचारला आहे. अजित पवारांनी राजकारणात आमच्या ८६ वर्षांच्या आईला ओढायला नको होतं असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं होतं. तसंच इतर काहींनी टीका केली होती. ज्यानंतर आता अजित पवारांनी ही खंत व्यक्त केली आहे.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion
Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हे पण वाचा- अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”

काय म्हणाले अजित पवार?

“बारामतीत मी आईसह मतदान करायला पोहचलो. ज्या आईच्या पोटी जन्माला आलो तिला बरोबर घेऊन मतदाना करणं यात काय गैर आहे? मी पहिल्यांदाच असं केलेलं नाही. प्रत्येक मतदानाच्या वेळी आई माझ्याबरोबर येते. यांच्या आत्ताच का पोटात दुखलं? काय म्हणाले दादा, राजकारण करतो आहे. आता यात कसलं आलंय राजकारण? मला आईने सांगितलं की आपण बरोबर जायचं. त्यामुळे आम्ही बरोबर जाऊन मतदान केलं.” असं अजित पवार म्हणाले आहेत.

श्रीनिवास पवार काय म्हणाले होते?

माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद घ्यावी या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपासह गेल्यापासून अशाच प्रकारे बोलत आहेत. अजित पवारांनी ८६ वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले. अजित पवार यांनी यावर काहीही उत्तर अजून दिलेलं नाही. मात्र आज त्यांनी हेदेखील सांगितलं की पवार कुटुंब खूप मोठं आहे आणि माझ्या विरोधात फक्त तीन कुटुंब गेली आहेत.

हे पण वाचा- Ajit Pawar: “बाबा तूच वस्तरा घेऊन ये, आणि..”, मिशी काढण्याच्या टीकेवरुन अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना उत्तर

मला अजितची भूमिका पटलेली नाही

सुप्रिया सुळे ही माझी लहान बहीण आहे. ग्रामीण भागात आम्ही कधीही सख्खे चुलत करत नाही. ती माझी बहीण आहे म्हणून मी त्यांच्या बाजूने आहे. पैसे वाटपाचं काय प्रकरण आहे ते रोहित फिरत असेल तर रोहितला माहीत असेल असंही श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. राजकारणात आम्ही कुणीच नाही. मी त्याचा सख्खा भाऊ आहे. मी वेगळा झालो पण मला त्याची भूमिका पडली नाही त्यामुळे मी उघड भूमिका घेतली आहे. चांगली गोष्ट आहे की आई त्याच्या बरोबर सांगितलं. मोदींच्या आई बद्दल दादा काही दिवसांपूर्वी बोलला होता. तोच प्रकार दादा तिकडे जाऊन शिकला असाही टोला श्रीनिवास पवार यांनी लगावला होता. आता अजित पवारांनी या सगळ्या टीकेवर उत्तर दिलं आहे.

Story img Loader