Nala Sopara Cash For Votes Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (१८ नोव्हेंबर) संपुष्टात आला. बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात मतदान पार पडणार आहे. सर्वांचं मतदानाकडे लक्ष असताना विरारमधून खळबळजनक घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. तर, भाजपाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. यासह विनोद तावडे यांनी २५ वेळा मला फोन करून माफी मागितल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. पाठोपाठ यावर आता राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग याप्रकरणी कारवाईच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, “आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारे प्रलोभन दाखवणं अपेक्षित नाही. कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. आम्ही सर्व जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्याचा उल्लेख प्रसारमाध्यमं करत आहेत त्या नालासोपाऱ्यातील प्रकरणाची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमचं एक पथक त्वरित घटनास्थळी दाखल झालं. तिथे जे काही चालू होतं त्याबाबत दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला माहिती दिली. त्या पक्षाचे लोक व आमचे अधिकारी तिथे दाखल झाले. जिल्हाधिकारी व वसई-विरार शहराचे पोलीस आयुक्त घटनास्थळी धाव घेतली आणि ताबडतोब कारवाई केली. यंत्रणा तिथे पोहोचली आहे.

हे ही वाचा >> Anil Deshmukh : अनिल देशमुख हल्ला प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलीस म्हणाले…

विरारच्या विवांता हॉटेलमध्ये काय घडलं?

विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील विवांता हॉटेलमध्ये आज (१९ नोव्हेंबर) सकाळी अचानक खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये आले होते. भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवाराची भेट घेण्यासाठी विनोद तावडे या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व आमदार क्षितिज ठाकूर हॉटेलमध्ये आले. या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. तसेच एक डायरी दाखवली, जी डायरी तावडेंची असून या डायरीत कोणाला किती पैसे दिल्याचा हिशेब आहे, असंही बविआ कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

बविआचे आरोप काय?

हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंनी मला फोन करून माफी मागितली असल्याचा दावा केला आहे. तसेच एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, “पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे तिथे आले होते. दोन डायऱ्यादेखील तिथे मिळाल्या आहेत. पैशांचं कुठे व कसं वाटप केलं जाईल याबाबतची माहिती त्या डायऱ्यांमध्ये आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nala sopara cash for votes maharashtra assembly election 2024 vinod tawde kshitij hitendra thakur asc