भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर आज झालेल्या गंभीर आरोपांमुळे दिवसभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडेंवर थेट पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. एवढंच नसून, विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे असताना तिथे पैसे व वाटपासंदर्भातला तपशील असणारी डायरीही सापडल्याचा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. यावेळी क्षितिज ठाकूर व त्यांच्य कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घालून प्रचंड गोंधळ घातला. विनोद तावडेंवरील आरोपांनंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यासंदर्भात सविस्तर माहिती व विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

‘विवांता’ हॉटेलमध्ये नेमकं घडलं काय?

विरार पूर्वमधील विवांता हॉटेलला आज राजकीय आखाड्याचं स्वरूप आलं होतं. एकीकडे विनोद तावडे व त्यांच्यासमवेतचे भाजपा कार्यकर्ते तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असा गोंधळ हॉटेलमध्ये निर्माण झाला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे मतदारसंघात पैसे वाटत असल्याचा आरोप केला. हितेंद्र ठाकूर यांनी तर एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भाजपावाल्यांनीच तावडे पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती दिल्याचा दावा केला. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगू लागला.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Girish Kuber Explanation About Gurdian Minister Post
Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
sanjay gaikwad mutton liquor
Video : “मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे; ते विकले…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडीओने खळबळ

जवळपास तीन ते चार तास विनोद तावडेंना हॉटेलमध्ये घेराव घालण्यात आला. त्यानंतर विनोद तावडे व हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून घटनास्थळावरून निघाले. त्यावेळी दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसून येत होतं. आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे इतर नेत्यांनी मतदारसंघात थांबायचं किंवा फिरायचं नसतं, एवढी साधी बाबही माहिती नाही का? असा सवाल करणारे हितेंद्र ठाकूर नंतर विनोद तावडेंसोबतच एकाच गाडीतून जाताना दिसून आले.

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची पत्रकार परिषद

दरम्यान, विनोद तावडेंवर आरोप झाल्यानंतर दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर सविस्तर भूमिका मांडली. “आज महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा निराधार आरोप लावून वातावरण प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. ज्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात हा आरोप करण्यात आला, तिथे महाविकास आघाडी मुख्य लढतीतच नाहीये. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असं हे झालंय. तिथे चहापेक्षा किटलीच गरम दिसतेय”, असं म्हणत त्यांनी मविआवर टीकास्र सोडलं.

“विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महासचिव आहेत. संघटनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांवर देखरेख ठेवत आहेत. ते वाडाहून निघाले होते. आपल्या संघटनात्मक जबाबदारीचा भाग म्हणून वेगवेगळ्या उमेदवारांशी ते फोनवर चर्चा करत होते. नालासोपाऱ्याच्या उमेदवाराने त्यांना त्या हॉटेलमध्ये चालू असलेल्या बैठकीसाठी बोलवलं. ते हॉटेल महामार्गाच्या जवळ असल्यामुळे विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये बैठकीत सहभागी झाले. निवडणूकपूर्व तयारीची ती इनडोअर बैठक आहे. ती नियमानुसारच घेतली जाते. मतदानकाळात व निकालाच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी, यासंदर्भात या बैठकीत चर्चा होते. त्यामुळे तिथे ते उपस्थित झाले”, अशी माहिती त्रिवेदी यांनी दिली.

“सीसीटीव्ही फूटेज तपासा”

विनोद तावडेंवर झालेल्या आरोपांसंदर्भात हॉटेल किंवा आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहावं, असं सुधांशु त्रिवेदी म्हणाले आहेत. “तिथे अचानक तिथले बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आले. त्यांनी तिथे वाद घालायला सुरुवात केली. विनोद तावडेंनी स्पष्टपणे सांगितलं की ही घटना हॉटेलमधील आहे. कुठल्या खासगी ठिकाणची नाही. तुम्ही हॉटेल आणि आसपासच्या भागातलं सीसीटीव्ही फूटेज तपासा. एक प्रकारचा अतार्किक, हास्यास्पद आणि दुर्दैवी आरोप करण्यात आला आहे. मी काँग्रेसवाल्यांना विचारेन की पाच कोटी रुपये कुणी खिशात घालून तर आणू शकत नाहीत. ते मोठ्या प्रमाणात दिसायला हवेत ना. ते दाखवावेत, हवेत आरोप करू नयेत”, असं म्हणत त्रिवेदी यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं.

Vinod Tawde: नालासोपाऱ्यातील कथित पैसेवाटपप्रकरणी निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, मोठ्या कारवाईची शक्यता; निवडणूक अधिकारी म्हणाले…

“त्या बैठकीत पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाहेरची कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यामुळे पैसे दिले कुणाला जात होते? त्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवार तिथे आले. ते तिथे काय करायला आले होते? आपला संभाव्य पराभव समोर पाहून गडबडीत, नैराश्यात महाविकास आघाडी विक्षिप्तपणाच्या सीमेवर पोहोचली आहे”, अशा शब्दांत सुधांशु त्रिवेदी यांनी विरोधकांवर टीका केली.

Story img Loader