Nalasopara Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आज २३ नोव्हेंबरला मतमोजणी सुरू झाली आहे. अशात नालासोपारा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. याचं कारण म्हणजे,पैसे वाटपाच्या प्रकरणावरून या मतदारसंघात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता.
क्षितीज ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर पैशांचे वाटप केल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नालासोपारा विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा मोठा फटका बसणार आणि बविआच्या क्षितीज ठाकूर यांना याचा फायदा होणार, असं म्हटलं जात होतं. मात्र, निकालाची आकडेवारी हाती येण्यास सुरुवात होताच महायुतीनं २२४ हून अधिक जागांवर आघाडी घेत एकहाती विजयावर नाव कोरलं. तसेच नालासोपाऱ्यात भाजपाचे राजन नाईक यांनी १,१०,७५५ मतं मिळवीत विजय साकारला आहे.
हेही वाचा : हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी
नालासोपाऱ्यातील कोण किती मतांनी आघाडीवर आणि पिछाडीवर
भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना १,१०,७५५ मते; तर बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना ८६,०३८ मते मिळाली. म्हणजे राजन नाईक यांच्याकडे २४,७१७ मतांची आघाडी; तर बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर हे तेवढ्याच मतांची पिछा़डी आहे. मनसेचे उमेदवार विनोद मोरे यांना १२,१७० मते मिळाली असून, ते ९८,५८५ मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार संदीप पांडे यांना ९,५१७ मते मिळाली असून, ते १,०१,२३८ मतांनी पिछाडीवर आहेत.
नालासोपाऱ्यात नेमकी काय घटना घडली होती?
१९ नोव्हेंबरला विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्याकडून महिलांना पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. ही माहिती मिळाल्यावर काही वेळातच बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादाविवाद सुरू झाला.
हेही वाचा : Election results 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विजय
दरम्यान, काही वेळाने क्षितीज ठाकूरदेखील हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये त्यांना पैशांची पाकिटे सापडली. ही पैशांची पाकिटे त्यांनी तावडे यांना दाखवली. त्यामुळे पुढे वाद वाढला आणि दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते.