Nana Patole : काँग्रेस आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. महायुतीला २३० हून अधिक जागांवर आघाडी आहे. या सगळ्या निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने हा निकाल काहीतरी गडबड करुन लावण्यात आला आहे असं सांगितलं आहे. मात्र काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला आहे. नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपाच्या अलिनाष ब्राह्मणकर यांचा पराभव केला आहे. नाना पटोले यांचा साकोलीतून विजय झाला आहे. २८ फेऱ्यानंतर नाना पटोले हे ६०० मतांनी मागे होते. मात्र आता त्यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

नाना पटोले यांचा निसटता विजय झाला आहे तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या दिग्गजांचा पराभव झाला आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण आणि संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या या दोन दिग्गजांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. काँग्रेससाठी हा पराभव फार मोठा आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २३१ जागांवर महायुतीची आघाडी आहे. त्यापैकी १०१ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तर इतर ३२ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Swati Maliwal
Arvind Kejriwal Lost : “अहंकार रावण का भी नहीं बचा था…”, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर, ‘आप’च्याच खासदाराची पोस्ट व्हायरल
Manish Sisodia Janpura Vidhan Sabha Election 2025 Results
Manish Sisodia Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मनिष सिसोदियांचा पराभव; प्रतिक्रिया देत म्हणाले, “६०६ मतांनी मी…”
Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ

हे पण वाचा- Assembly Election Result : सहा महिन्यांत काँग्रेसच्या मतांमध्ये सहा टक्क्यांची घट; अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र दमदार कामगिरी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला तीनवेळा उत्तम यश

भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. कारण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर विजय मिळूनही त्यांना विरोधात बसावे लागले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय भाजपने त्यांच्या नेतृत्वात लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, भाजपाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सलग तीन टर्म शतकेपार झेंडा फडकवला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला २०१४, २०१९ आणि २०२४ या कालावधीत सलग तीनवेळा स्प्ष्ट बहुमत मिळाले आहे. तर, २०१४ मध्ये भाजपाला १२३ जागा, २०१९ मध्ये १०५ आणि २०२४ मध्ये १०० पेक्षा जास्त जागांवर भाजपाचा विजय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे,आजच्या विजयानंतर भाजपाने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. विशेष म्हणजे सलग तीनवेळा भाजपाला शंभरीपार नेण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जमलेला नाही. त्यामुळे, हे यश महत्वाचं मानलं जातं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जातो आहे.

Story img Loader