Ravindra Chavan Victory Nanded Bypoll 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल देखील आज जाहीर झाला. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर रिक्त झालेली ही जागी पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या हाती आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी १ हजार मतांनी भाजपाच उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे याचा १४५७ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. एकूण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, जे काँग्रेससाठी फार धक्कादायक होते. पण नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय हा कुठेतरी काँग्रेससाठी सुखद धक्का मानला जातो. मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यामध्ये काँग्रेस उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी मुसंडी मारत आणि डाव पलटवला आणि विजय आपल्या बाजून खेचून आणला.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे उमदेवार प्रतापराव चिखलीकर यांचा ५९ हजार मतांनी पराभव केला, पण २६ ऑगस्ट रोजी वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली, या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमदेवारी घोषित केली. तर त्यांच्याविरोधात भाजपाने संतुक हंबर्डे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. अतिशय अटीतटीची ही लढत होती. या निवडणकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात डॉ.संतुक हंबर्डे हे १६ हजार मतांनी आघाडी होते त्यामुळे भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गेम पलटला आणि काँग्रेसने पुन्हा ही जागा आपल्याकडे खेचून आणली, या निकालात रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांचा १४५७ मताधिक्याने पराभव केला. रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६७८८ मते मिळाली, तर डॉ.संतुक हंबर्डे यांना ५८५३३१ मत मिळाली.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?

नांदेड विधानसभा मतदार संघातील हा विजय भाजपा नेते अशोक चव्हाण यांच्यांसाठी मोठा धक्कादायक आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत एकूण १९ उमेदवारांचे भवितव्य आज पणाला लागले होते.पण यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये पाहायला मिळाली. या लढतीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला, परंतु काँग्रेसचा या विजय अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे. कारण नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची मोठी पकड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व आहे.

Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Election : महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री, आज लेकाने मारली बाजी

पण फेब्रुवारी २०२४ मध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसचे वर्चस्व कमी होतेय की काय अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र वसंतराव चव्हाण यांच्या विजयाने सर्वांनाच मोठा राजकीय धक्का बसला. आता वसंतराव यांच्या नंतर त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांनी नांदेडकरांनी संधी दिल्याने आता नांदेडमधून अशोक चव्हाण यांची जादू फोल ठरल्याचे दिसतेय.

Story img Loader