लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली बारामतीची लढाई ही अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा सामना आहे. या बाबत संजय राऊत यांनी बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे असं वक्तव्य सासवडच्या सभेत केलं आहे. इतकंच नाही तर मतं मिळावीत म्हणून अजित पवार धमक्या देत आहेत असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच भाजपाने पक्ष फोडले असं म्हणत नरेंद्र मोदी यांना पु्न्हा औरंगजेब म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्या काँग्रेससह जाऊन बसले अशी टीका कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. त्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता पण काँग्रेसयुक्त भाजपा झाला आहे. लोकशाही की हुकूमशाही हे ठरवायची ही निवडणूक आहे. कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण मी ऐकलं त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. औरंगजेबासारख्या काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे जाऊन बसले अशी टीका मोदींनी केली. मी मोदींना सांगू इच्छितो की पुरंदरचा तह झाला तेव्हाच औरंगजेब आणि अफझल खान गाडले गेले.”

bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते आहे

“नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात ते २७ वेळा आले. रोज पाहिलं की मोदी आणि शाह महाराष्ट्रात असतात. मुंबईत आठ सभा घेणार आहे. देश वाऱ्यावर सोडला आहे आणि महाराष्ट्र्रात येत आहेत कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते आहे. महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल असं त्यांना वाटतं आहे. “

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोंदींची घणाघाती टीका, “उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..”

नरेंद्र मोदींमध्येच औरंगजेब संचारला आहे कारण..

“मागच्या दहा वर्षांपासून देशाचा पंतप्रधान खोटं बोलतो आहे. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता. सगळ्या वचनांचा विसर मोदींना पडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला न्यायची हे यांचं धोरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला इतिहास आहे. आम्ही विचार करतो की नरेंद्र मोदी औरंगजेबासारखे का वागतात? कोल्हापूरच्या भाषणात मोदी म्हणाले उद्धव ठाकरे औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडला आहे. मात्र नरेंद्र मोदी तुम्ही स्वतः औरंगजेब आहात. या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. गुजरातमध्ये दाहोत नावाचं गाव आहे त्या गावात औरंगजेबाचा जन्म झाल्याने मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आहे. त्यामुळेच वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करुन येत आहेत. त्याचं कारण त्या मातीत आहे तिथे औरंगजेब जन्माला आला होता. त्यामुळेच शिवरायांच्या महाराष्ट्रावर चाल करुन येत आहेत.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस परवाच्या भाषणात भयंकर खोटं बोलले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे काँग्रेस सत्तेवर आली तर संपत्ती काढून घेऊ आणि मुस्लिमांना वाटू. महाराष्ट्रातल्या महिलांच्या गळ्यांतील मंगळसूत्रं खेचतील आणि मुस्लिमांना वाटतील. ज्या माणसाने घरातल्या मंगळसूत्राची किंमत केली नाही त्याने ही वक्तव्यं करु नयेत” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.