Narendra Modi about Balasaheb Thackeray at Chhatrapati Sambhaji Nagar BJP Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एका प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेत ते म्हणाले, “महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यंदा ही यंदा दोन विचारधारांमधील लढाई आहे. या निवडणुकीत एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्यांची टोळी आहे. काही लोक असे आहेत जे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्यांना आपला आदर्श मानतात. तर,आमच्या बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे लोक आहेत. तुम्हाला (जनतेला) असं वाटत नाही की हे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात आहेत?”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील जनतेला आठवण करून दिली की या जिल्ह्याचं नाव पूर्वी औरंगाबाद होतं. ते म्हणाले, “या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं जावं अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केलं. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार होतं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र, ते लोक बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर अवघ्या काही महिन्यांत आम्ही बाळासाहेबांची ती अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण केली”.

Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!

हे ही वाचा >> Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर केल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तो निर्णय खूप झोंबला. त्यांचे काही सहकारी न्यायालयात देखील गेले. त्यांनी आमच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे”.

आम्ही काँग्रेसला समाजा-समाजात फूट पाडू देणार नाही : मोदी

नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खूपत आला आहे. समाजांमध्ये फूट टाकणे आणि सत्ता काबीज करणे हेच त्यांचं आजवरचं धोरण राहिलं आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचं षडयंत्र काँग्रेसने रचलं आहे. परंतु, आम्ही त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही”.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!

पंतप्रधान म्हणाले, देशाला गेल्या १० वर्षांपासून ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. मात्र हेच काँग्रेसला खुपतंय. काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत. जेणेकरून त्या छोट्या जातींची, समुदायांची राजकीय शक्ती कमी व्हावी आणि ठराविक लोकांनाच सत्तेचा मलिदा मिळावा.