Narendra Modi On Election Result : “जम्मू काश्मीरमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा; मतांच्या टक्केवारीबाबत म्हणाले…

प्रत्येक जात आणि धर्मातील लोकांनी आम्हाला मते दिलं आहे, असंही मोदी म्हणाले.

Narendra Modi on jammu kashmir election
जम्मू काश्मीर निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? (फोटो – BJP/X)

Narendra Modi On Election Result : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ४२ जागा मिळवत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने बाजी मारली आहे. तर, भाजपाला २९ जागा मिळाल्या आहेत. परंतु, तरीही भाजपाच या राज्यात मोठा पक्ष बनला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आज त्यांनी दिल्लीतील मुख्यालयात पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

“हरियाणाच्या लोकांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. कमल कमल करून टाकलं आहे. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. माँ कात्यायानीच्या आराधनेचा दिवस आहे. अशा पावन दिनी हरियाणात तिसऱ्या वेळेला सलग कमळ फुललं आहे. प्रत्येक जात आणि धर्मातील लोकांनी आम्हाला मते दिलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शांतीपूर्वक निवडणुका झाल्या. मतमोजणी झाली, निकाल आले हे भारताच्या संविधानाचा विजय, लोकशाहीचा विजय आहे.

Like British Congress only thoughts of looting country modi criticism in phohadevi washim
काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
What Pawan Kalyan Said?
Pawan Kalyan : ‘सनातन धर्मा’च्या रक्षणासाठी केंद्रीय कायदा हवा’, आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
RSS Sunil Ambekar explains Why are there no girls in Shakhas
RSS च्या शाखांमध्ये मुली का नसतात? प्रवक्ते म्हणाले, “समाजातून…”
pm Narendra modi birthday
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज ७५ व्या वर्षात पदार्पण; वाढदिवस कसा साजरा करणार?

“जम्मू काश्मीरच्या लोकांनी नॅशनल कॉन्फरन्सला जास्त जागा दिल्या आहेत. मतांच्या टक्केवारीत पाहिल्यास जम्मूत जितके पक्ष निवडणूक लढवत होते, त्यानुसार वोट शेअरिंगच्या तुलनेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे”, असंही मोदी म्हणाले.

काँग्रेससाठी नो एन्ट्रीचा बोर्ड लावला

भाजपा एनडीए सरकारला लोक सातत्याने संधी देत आहेत. आसाम, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये भाजपाचे सरकार आहे. जिथं जिथं भाजपा सरकार बनवते तेथील जनता दीर्घकाळ भाजपाला समर्थन देते. दुसरीकडे गेल्याकाही वर्षांत काँग्रेस सरकारची वापसी कोणत्याच राज्यात झालेली नाही. किती वर्षांपूर्वी ते पुन्हा सत्तेत आले होते? २०११ मध्ये आसामध्ये त्यांचं सरकार पुन्हा आलं होतं. त्यानंतर जितक्या निवडणुका झाल्या, लोकांनी काँग्रेसला पुन्हा संधी दिली नाही. देशात किती राज्य आहेत जिथं काँग्रेस कधी साठ, पन्नास वर्षे होती? पुन्हा ते तेथे सत्तेत आलेच नाहीत. एकदा लोकांनी त्यांना काढून टाकलं की त्यांना घुसूच दिलं नाही. काँग्रेससाठी नो एन्ट्रीचा बोर्ड लावला आहे. पूर्वी काँग्रेस विचार करायची की ते काम करो वा ना करो, लोक त्यांना मतदान करतीलच, पण आता काँग्रेसची पोलखोल झाली आहे. त्यांचा डब्बा गुल झाला आहे”, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

हेही वाचा >> Haryana Results : हरियाणा निकालानंतर पंतप्रधान मोदींची बोचरी टीका, “काँग्रेसचा डबा गुल झाला आहे, पितळ उघडं पडलं आहे, आता..”

काँग्रेसने दलित, मागास यांच्यावर सर्वाधिक अन्याय केले

काँग्रेसने दलित, मागास यांच्यावर सर्वाधिक अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे. काँग्रेसने इतक्या दशकांपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा यांपासून वंचित ठेवलं. १०० वर्षांनी सत्ता मिळाली तरीही दलित किंवा मागास माणसाला हे पंतप्रधान होऊ देणार नाहीत हा यांचा खरा चेहरा आहे. काँग्रेसचं कुटुंब दलित, आदिवासी आणि मागास वर्ग यांचा तिरस्कार करतं. त्यामुळेच हे लोक पुढे गेले तर त्यांच्या पोटात दुखू लागतं. हरियाणातही यांनी हेच केलं. दलित, मागास वर्गातल्या लोकांचा अपमान केला. काँग्रेसच्या शाही कुटुंबाने सांगितलं आम्ही आरक्षण संपवणार. दलित आणि मागासवर्ग यांचं आरक्षण हिसकावून ते त्यांच्या व्होट बँकेला देणार होते. हरियाणात हेच घडवायचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. काँग्रेस भारताच्या समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांना अराजक पसरवायचं आहे असाही आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. शेतकऱ्यांना भडकवण्याचाही प्रयत्न हरियाणात करण्यात आला. पण हरियाणातील शेतकऱ्यांनी त्यांना करारा जवाब दिला आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narendra modi on election result bjp is the largest party in jammu and kashmir claims prime minister narendra modi sgk

First published on: 08-10-2024 at 21:46 IST

संबंधित बातम्या