पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १३ मे) बिहारच्या मुजफ्फरपूर येथे जाहीर सभा घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुजफ्फरपूरमधील एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. “भारताने पाकिस्तानशी सुसंवाद राखावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो”, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं. अय्यर यांच्या या वक्तव्यावरून मोदींनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, हे काँग्रेसवाले खूप घाबरलेले आहेत. हे लोक इतके घाबरले की यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो. काँग्रेससारखे हे पक्ष आणि त्यांच्यां नेत्यांना रात्री झोपेतही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसत राहतो. हा देश अशा लोकांच्या ताब्यात देऊन कसं चालेल? हे काँग्रेसवाले आणि इंडिया आघाडीतील नेते हल्ली ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत, ती वक्तव्ये पाहून हसू येतं. तसेच हे किती भित्रे आहेत ते समजतं. हे काँग्रेसवाले पाकिस्तानला किती घाबरलेले आहेत ते त्यांच्या अशा वक्तव्यांवरून स्पष्ट होतं.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Those who do not accept Hindu Rashtra should go to Pakistan says Dhirendrakrishna Shastri
हिंदू राष्ट्र मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे वक्तव्य
shahbaz sharif government approves bill to extend army chief service tenure in pakistan
विश्लेषण : पाकिस्तानात शरीफ सरकारचा आत्मघातकी निर्णय… लष्करप्रमुखांचा कार्यकाळ दहा वर्षे… भारताची डोकेदुखी वाढणार?
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

मोदी म्हणाले, ते काँग्रेसवाले म्हणतायत की, पाकिस्तानने काय बांगड्या भरलेल्या नाहीत, नसतील भरल्या तर मग आम्ही भरू. आता पाकिस्तानला पीठ हवं आहे. त्यांच्याकडे वीज नाही, हे आम्हाला माहिती होतं. परंतु, पाकिस्तानकडे बांगड्या देखील नाहीत हे माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या हातात बांगड्या भरू.

पंतप्रधान म्हणाले, काहीजण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लीनचिट देत आहेत. तर, तेच लोक आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्य सर्जिकल स्ट्राइकवर किंवा एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हे लोक भारताची आण्विक शस्त्रास्रे संपवण्याचा डाव रचत आहेत. कधी कधी असं वाटतं की या काँग्रेसवाल्यांनी, इंडिया आघाडीवाल्या लोकांनी भारताविरोधात मोर्चा काढला आहे. त्यांनी कोणाकडून तरी भारताची सुपारी घेतली आहे. असे हे स्वार्थी लोक राष्ट्ररक्षेसाठी कठोर निर्णय घेऊ शकतात का? अशा संघटना, ज्यांचं काही अस्तित्वच नाही ते भारताला मजबूत बनवू शकतात का? हे लोक भारताला मजबूत नव्हे तर मजबूर करतील.

हे ही वाचा >> “मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशकात उतरवल्या नऊ बॅगा”, VIDEO शेअर करत संजय राऊत म्हणाले, “त्यामध्ये तब्बल…”

मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते?

मणिशंकर अय्यर म्हणाले, पाकिस्तानकडे अणूबॉम्ब आहे. आपल्याकडेही अण्वस्त्र आहेत. परंतु, एखाद्या वेड्याने लाहोरवर अणूबॉम्ब टाकण्याचा विचार केला तर त्याचे किरणोत्सर्ग अमृतसरपर्यंत पोहोचायला ८ सेकंदही लागणार नाहीत. आपणही पाकिस्तानचा आदर राखला पाहिजे. तसं केल्यास तेही शांतता राखतील. परंतु, आपण त्यांना डिवचलं आणि एखाद्या माथेफिरूने आपल्यावर अणूबाम्ब टाकला तर काय होईल?