Premium

“मी गेल्या जन्मी पश्चिम बंगालमध्ये जन्मलो असेन”, नरेंद्र मोदी असं का म्हणाले? ममता बॅनर्जींचा उल्लेख करत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं.

narendra modi
मालदा येथील प्रचारसभेला जमलेल्या लोकांची गर्दी पाहून मोदी म्हणाले, तुमचं प्रेम माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. (PC : Narendra Modi/X)

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या चालू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२८ एप्रिल) पश्चिम बंगालमधील मालदा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेला जमलेली मोठी गर्दी पाहून नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्ते आणि आयोजकांचं कौतुक केलं. मोदी म्हणाले, लोकांचा हा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला. देशातील जनता लोकशाहीचा उत्सव साजरा करतेय, हे पाहून बरं वाटलं. तुमचं प्रेम, तुमचा उत्साह माझ्यासाठी शिरसावंद्य आहे.

पंतप्रमधान मोदी म्हणाले, तुमचं सर्वांचं प्रेम पाहून मला वाटतं की, मी गेल्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो असेन, किंवा पुढच्या जन्मी मी पश्चिम बंगालमधील एखाद्या आईच्या पोटी जन्म घेईन. इतकं प्रेम मी पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या नशिबी इतकं प्रेम कधीच नव्हतं.

Katol, Katol Constituency, Katol NCP, Vidarbha,
काँग्रेसकडून विदर्भात सांगली प्रारुपाची पुनरावृत्ती? राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघाकडे लक्ष
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
Chief Minister Eknath Shinde Shiv Sena challenges BJP leaders in Boisar Assembly Election 2024
मुख्यमंत्री शिंदे यांच्या खेळीने बोईसरमध्ये भाजप नेते अस्वस्थ
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
Campaigning ends for final phase of J-K Assembly elections
जम्मूकाश्मीरमध्ये प्रचाराची सांगता ; अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षखरगेंची प्रकृती बिघडली
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे

एके काळी बंगाल हे भारताच्या विकासाचं इंजिन होतं. सामाजिक सुधारणा असतील, संशोधन असेल, वैज्ञानिक क्षेत्रातील भरीव कामगिरी असेल अथवा मोठे विक्रम असतील, प्रत्येक क्षेत्रात बंगालने नेतृत्व केलं आहे. बंगालने नेहमीच देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. परंतु, नंतरच्या काळात डावे पक्ष आणि आता तृणमूल काँग्रेसने या राज्याची महानता आणि नावलौकिक धुळीस मिळवला आहे. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंगालच्या विकासाची गाडी अडवली आहे.

हे ही वाचा >> “म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला…”, सदाभाऊ खोतांची तुफान टोलेबाजी

नरेंद्र मोदी म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या शासनकाळात राज्यात एकच गोष्टी झाली आहे ती म्हणजे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने राज्याचा विकास थांबवला आहे. त्यांच्या काळात इथे केवळ घोटाळ्यांची रांग लागली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narendra modi says i think was born in west bengal last time lok sabha election public rally malda asc

First published on: 26-04-2024 at 14:22 IST

संबंधित बातम्या