लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या चालू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२८ एप्रिल) पश्चिम बंगालमधील मालदा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेला जमलेली मोठी गर्दी पाहून नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्ते आणि आयोजकांचं कौतुक केलं. मोदी म्हणाले, लोकांचा हा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला. देशातील जनता लोकशाहीचा उत्सव साजरा करतेय, हे पाहून बरं वाटलं. तुमचं प्रेम, तुमचा उत्साह माझ्यासाठी शिरसावंद्य आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रमधान मोदी म्हणाले, तुमचं सर्वांचं प्रेम पाहून मला वाटतं की, मी गेल्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो असेन, किंवा पुढच्या जन्मी मी पश्चिम बंगालमधील एखाद्या आईच्या पोटी जन्म घेईन. इतकं प्रेम मी पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या नशिबी इतकं प्रेम कधीच नव्हतं.
एके काळी बंगाल हे भारताच्या विकासाचं इंजिन होतं. सामाजिक सुधारणा असतील, संशोधन असेल, वैज्ञानिक क्षेत्रातील भरीव कामगिरी असेल अथवा मोठे विक्रम असतील, प्रत्येक क्षेत्रात बंगालने नेतृत्व केलं आहे. बंगालने नेहमीच देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. परंतु, नंतरच्या काळात डावे पक्ष आणि आता तृणमूल काँग्रेसने या राज्याची महानता आणि नावलौकिक धुळीस मिळवला आहे. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंगालच्या विकासाची गाडी अडवली आहे.
हे ही वाचा >> “म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला…”, सदाभाऊ खोतांची तुफान टोलेबाजी
नरेंद्र मोदी म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या शासनकाळात राज्यात एकच गोष्टी झाली आहे ती म्हणजे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने राज्याचा विकास थांबवला आहे. त्यांच्या काळात इथे केवळ घोटाळ्यांची रांग लागली आहे.