लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. १ जून रोजी सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचा विजय होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच निकालाच्या दिवशी ते काय करतात? त्यांची दिनचर्या नेमकी कशी असते, यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!

पंतप्रधान मोदी यांनी आज एबीपी न्यूजला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. या दरम्यान, त्यांना निकालादिवशी उत्सुकता आणि मनात धाकधूक असते का? तसेच या दिवशी तुमची दिनचर्या नेमकी कशी असते? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाकडे बघतही नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी २००२ साली मुख्यमंत्री असतानाचा एक प्रसंगही सांगितला.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“निकालाच्या दिवशी मी सहसा निवडणुकीसंदर्भातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सकाळी उठून मी नेहमी पेक्षा जास्त वेळ ध्यान करतो. निकालाच्या दिवशी कोणालाही माझ्या खोली प्रवेश करण्याची परवानगी नसते. त्यादिवशी मी फोन घेत नाही. मात्र, दुसरं महत्त्वाचं काम असल्यास तो फोन घेतला जातो”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

हेही वाचा – “देशात लव्ह जिहादची सुरुवात झारखंडमधून झाली”; पंतप्रधान मोदींचं विधान चर्चेत!

मुख्यमंत्री असतानाचा प्रसंगही सांगितला

२००२ सालचा प्रसंग सांगताना ते म्हणाले, “मी २००१ साली मुख्यमंत्री झालो आणि २००२ साली गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळच्या निवडणूक आयोगाकडून मला सातत्याने त्रास दिला जात होता. माझ्यापुढे अनेक समस्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असे अनेकांना वाटत होते. पण त्या निकालाच्या दिवशी मी फोन बंद करुन ठेवला होता. मी माझ्या खोलीत एकटा होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास माझ्या घरा समोर ढोल ताशे वाजायला सुरुवात झाली. त्यावेळी दुपारी मला निकालाचा अंदाज आला”, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi told about his schedule on result day said no one can enter in my room spb