Premium

Karnataka Election Results 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार नेमके कोणत्या मतदारसंघातून उभे होते? वाचा यादी!

Karnataka Assembly Election 2023 Results Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. निपाणीत उत्तमराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

karanataka election result 2023 sharad pawar
कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँघ्रेसच्या उमेदवारांची यादी (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी नऊ ठिकाणी उमेदवार दिल्याची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडली होती. विशेषत: सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राष्ट्रवादीचे इतर उमेदवार नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, याची यादी राष्ट्रवादीच्या कामगिरीचं मूल्यमापन करताना महत्त्वाची ठरणार आहे. बेळगाव, विजापूर, विजयनगर, कोप्पल, कोडोगो, मैसूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार उभे केले होते.

१. निपाणी (बेळगाव) – उत्तमराव पाटील

Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान

२. जेवर हिप्पारगी (विजापूर) – मन्सूर साहेब बिलाही

३. बसवन बागेवाडी (विजापूर) – जमीर अहमद इनामदार

४. नागथन (विजापूर) – कुलप्पा चव्हाण

५. येलबर्गा (कोप्पल) – हरी आर

६. रानबेन्नूर (हवेरी) – आर. शंकर

७. हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर) – सुगुना के

८. विराजपेट (कोडोगो) – एस. वाय. एम. मसूद फौजदार

९. नरसिंहराज (मैसूर) – रेहाना बानो

 “‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

भाजपाच्या हातून कर्नाटक निसटलं!

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसनं बहुमताच्या दिशेनं आगेकूच केली असून एक्झिट पोलपेक्षाची उजवी कामगिरी पक्षानं राज्यात करून दाखवली आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारानंतरही राज्यातील मतदारांनी भाजपाच्या राजकारणाला नाकारल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp candidates list in karnataka assembly election results 2023 pmw

First published on: 13-05-2023 at 12:16 IST

संबंधित बातम्या