लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. तसेच महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झाले आहे. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकाल लागेपर्यंत ईव्हीएम मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी तसेच स्ट्राँग रुमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करत खळबळजनक आरोप केला आहे.

अहमदनगरमध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून एका अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच ‘संरक्षणव्यवस्था थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आला आहे, कुंपणच शेत खात असून लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

हेही वाचा : “शरद पवारांना आता १० वर्षांनी जाग आली का?” ‘त्या’ टीकेला अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर!

निलेश लंके यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

“संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतंय”, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निलेश लंके हे या निवडणुकीत आमने-सामने आहेत. येथील मतदान झालेले असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाने नगरचं राजकारण चांगलंच राजकारण तापलं होतं. तसेच अहमदनगरमध्ये भाजपाने पैसे वाटल्याचा आरोपही निलेश लंके यांच्याकडून करण्यात आला होता. तेव्हाही निलेश लंके यांनी काही व्हिडीओ शेअर करत विरोधकांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून एका अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा आरोप केला आहे.