Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates : बहुप्रतीक्षित १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (४ जून) जाहीर झाला. देशात आणि महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाने यावेळी ४०० जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र त्यांना २५० जागा देखील जिंकता आल्या नाहीत. तर महाराष्ट्रात महायुतीने ४५ हून अधिक जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पदरात केवळ १७ जागा टाकल्या तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात अनेक दौरे केले होते. मात्र यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं दिसत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या २३ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्यापैकी बहुसंख्य उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या २३ उमेदवारांसाठी मोदी यांनी १८ सभा घेतल्या होत्या, तसेच एक रोड शो केला होता. मात्र या २३ पैकी १८ उमेदवार पराभूत झाले आहेत. तर केवळ ५ उमेदवार विजयी झाले आहेत

  • चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजपा) पराभूत – काँग्रेसच्या प्रतिभा धानोकरकर विजयी
  • रामटेक – राजू पारवे (शिंदे गट) पराभूत – काँग्रेसचे श्यामकुमर बर्वे विजयी
  • वर्धा – रामदास तडस (भाजपा) पराभूत – शरद पवार गटाचे अमर काळे विजयी
  • परभणी – महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) पराभूत – या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी
  • नांदेड – प्रतापराव चिखलीकर (भाजपा) पराभूत – काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी
  • कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे गट) पराभूत – काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
  • सातारा – उदयनराजे भोसले (भाजपा) विजयी – शरद पवार गटाचे उमेदवार शशिंकांत यांचा ३१ हजार मतांनी पराभव झाला आहे.
  • सोलापूर – राम सातपुते (भाजपा) पराभूत – काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी
  • पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजपा) विजयी – काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत झाले आहेत.
  • बारामती – सुनेत्रा पवार (अजित पवार गट) पराभूत – शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे १० हजार मतांनी आघाडीवर आहेत. (पुण्यात संयुक्त सभा)
  • धाराशिव – अर्चना पाटील (भाजपा) पराभूत – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर मोठा मताधिक्याने विजयी झाले आहेत.
  • लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजपा) पराभूत – काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी
  • बीड – पंकजा मुंडे (भाजपा) पराभूत – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी
  • अहमदनगर – सुजय विखे पाटील (भाजपा) पराभूत, शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी.
  • नंदुरबार – हिना गावित (भाजपा) पराभूत – काँग्रेसचे गोवाळ पाडवी विजयी
  • दिंडोरी – भारती पवार (भाजपा) पराभूत – शरद पवार गटाचे भास्कर भगरे विजयी
  • कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विजयी – ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभूत.

यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील महायुतीच्या सहा उमेदवारांसाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संयुक्त सभा घेतली होती. तसेच मुंबईत रोड शो देखील केला होता. मात्र मुंबीतील सहा पैकी चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आहेत. तर केवळ दोन मतदारसंघांमध्ये महायुतीला विजय मिळवता आला आहे.

हे ही वाचा >> “इथे मस्ती उतरवून मिळेल”, मविआच्या लोकसभेतील यशानंतर रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

  • मुंबई उत्तर – भाजपाचे पियुष गोयल (भाजप) विजयी – काँग्रेसचे भूषण पाटील पराभूत
  • मुंबई उत्तर पश्चिम – शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी – ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पराभूत
  • मुंबई उत्तर पूर्व – भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत – ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी
  • मुंबई उत्तर मध्य – भाजपाचे उज्ज्वल निकम पराभूत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी
  • मुंबई दक्षिण मध्य – शिंदे गटाचे राहुल शेवाळे पराभूत – ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी
  • मुंबई दक्षिण – शिंदे गटाच्या यामिनी जाधव पराभूत, ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी
मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nda 18 out of 23 candidats defeated for whom narendra modi held public meetings asc