१८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून आता सत्तास्थापनेचा दावा करण्याकरता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चढाओढ दिसतेय. एनडीएने बहुमाताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याकरता जुन्या मित्र पक्षांना बरोबर घेण्याकरता जोर बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एनडीएची बैठक संपली असून ते सात जूनला सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी आज एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान उपस्थित होते. बैठक संपली असून एनडीएचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
dr sulakshana shilwant dhar
“तीच्यावर पक्षाचा फार जीव”, शिलवंत यांचं तिकीट कसं कापलं? अजित पवारांनी सगळं सांगितलं
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीएने सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली आहे. या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या नेत्यांनी अधिकृतपणे एनडीएचा नेता म्हणून निवड केली आहे. युतीचं नेतृत्त्व करण्याकरता मोदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडून आल्यानंतर मोदींनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं की, मी सर्व मित्रपक्षांचे आणि खासदारांचे आभार मानतो. ज्यांनी मला एनडीएचा नेता म्हणून एकमताने निवडले आहे.

हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : एनडीएचे नेते लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेणार, इंडिया आघाडीचीही बैठक सुरू

एनडीए नेत्यांनी गरीब, महिला, तरुण, शेतकरी आणि इतर उपेक्षित गटांसह समाजातील वंचित घटकांना मदत करण्याकरता ठराव मंजूर केला गेला. या ठरावानुसार, वंचित घटकांच्या सक्षमीकरणाकरता धोरणे आणि कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वंचित राहिलेल्या लोकांचं जीवन सुधारण्यासाठी आणि विकासाचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील याची खात्री कऱण्याकरता युतीतील इतर घटकपक्षांनी दुजोरा दिला. हा ठराव एनडीए सरकारच्या भविष्यातील कृती आणि उपक्रमांसाठी मार्गदर्शक तत्व म्हणून काम करेल.

भाजपा बहुमतापासून किती दूर?

लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये १६ खासदार निवडून आले आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये १२ खासदार निवडून आले आहेत. भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे प५ खासदार निवडून आले आहेत. या तीनही पक्षांनी भाजपाला साथ दिली तर भाजपा सहज सत्ता स्थापन करू शकते.