Nilesh Rane to Joins Eknath Shinde Shivsena Kudal Vidhan Sabha Constituency : भाजपाचे नेते निलेश राणे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. निलेश राणे यांनी आज स्वत: पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली आहे. उद्या (२३ ऑक्टोबर) कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, निलेश राणेंच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे?

“मी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ हायस्कूल मैदानात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. मला पक्षात प्रवेश दिला, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?

हेही वाचा – Kudal Assembly Constituency: ठाकरे गटाचे वैभव नाईक हॅट्रिक साधणार की निलेश राणे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

“बाळासाहेब ठाकरे माझे दैवत”

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे. “विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊ आणि निवडून येऊ. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणाची सुरुवात केली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहणार आहेत”, असेही निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा – Shivsena UBT Pune Protest : नारायण राणेंना अटक करा, शिवसेना उबाठाची मागणी; पुण्यात आंदोलन, नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या…

“मला विकासासाठी निवडणूक लढवायची आहे”

“माझ्या घरात अनेक वर्षे लाल दिवा होता. मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार आहे. पक्ष हितासाठी जे करायचं आहे ते मी करेन. मी केव्हाही उद्याचा विचार करत नाही. मी जसा आहे, तसा आहे. उद्या मोठा कार्यक्रम होणार आहे. मी एका लहान कार्यकर्ता आहे, पण मला निवडणूक लढायची आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Bhaskar Jadhav on Guhaghar Dispute: भास्कर जाधवांनी सांगितला गुहागरमधील राड्याचा संपूर्ण घटनाक्रम!

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता

खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून निलेश राणे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज झालेल्या निलेश राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील प्रवेशानंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता.

Story img Loader