२०२४च्या लोकसभा निवडणुकीबाबत चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असे दिसते. “अबकी बार ४०० पार” असा दावा एनडीएने केला होता, पण भाजप २७२च्या आकड्याला अद्याप स्पर्श करू शकले नाही. NDAचा सध्या नितीश कुमार यांनी JDU आणि चंद्राबाबू नायडू यांचा TDP वर अवलंबून आहे.

अशा महत्त्वाच्या क्षणी पक्षांतर करण्याचा इतिहास असलेले नितीश कुमार महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात कारण इंडिया आघाडी देशभरात एक प्रचंड शक्ती म्हणून समोर येत आहे. आत्तापर्यंत, इंडिया आघाडीने २३० जागांवर बाजी मारली असली तरी २७२ च्या आकड्यापासून अद्याप खूप दूर आहेत.

दरम्यान लोकसभा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रमुख भूमिका असण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन जेडीयूकडून दबावाचे राजकारण सुरू केले आहे. नितीशचे आमदार खालिद अन्वर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. देशाचा पुढचा नेता कोण असेल असे विचारले असता ते म्हणाले की,”नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगला नेता कोण असेल असे उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यानंतर नितीश कुमार पुढील पंतप्रधान होणार का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा- हुकूमशाहीचा अंत निश्चित…”; आपच्या नेत्याने इंडिया आघडीच्या विजयावर व्यक्त केला विश्वास

सतत पक्षांतर करणाऱ्या नितीश कुमार यांना पलटूराम असे म्हटले जाते. त्यामुळे सोशल मीडिया नेटकऱ्यांनी त्यांच्यावर विनोदी टिका केली आहे. “जर त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली तर ते पुन्हा पक्षांतर करतील आणि राहुल गांधींच्या काँग्रेस बरोबर युती करतील, असा अंदाज अनेकांनी बांधला आहे.

“भाजपने २७२ चा आकडा स्वबळावर पार केला नाही तर NDA सरकार खूप अस्थिर होईल. नितीश आणि नायडूंसारख्या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. इंडिया आघाडीला त्यांना फक्त विचारावे लागेल की, ‘नितीश जी, इकडे या, तुम्हाला पंतप्रधान बनवतो आणि ते मागे वळून न पाहता पक्षांतर करतील. कदाचित ते आधीच काँग्रेस मुख्यालयात बसले असेल,” असा दावा एका सोशल मीडिया वापरकर्त्याने केला आहे.

हेही वाचा – “काँग्रेस हरल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये बिघाड असल्याचा आरोप करते”: भाजप उमेदवार सीपी जोशींचा टोला

“एनडीएचे आकडे निरर्थक आहेत. जर भाजपला २७२ मिळाले नाहीत तर नितीश कुमार, अजित पवार, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी यांसारखे लोक पक्ष बदलणार नाहीत असे तुम्हाला वाटते का? असे मत आणखी एकाने व्यक्त केले.

“नितीश कुमार हे भारतीय राजकारणी धूर्त कोल्हे आहेत, त्यांना वाऱ्यांची दिशा माहीत आहे. हे वक्तव्य खरचं चूकून केले गेले आहे की, नुकतेच मोदींना बाजूला केल्याबद्दल नितीश यांच्यावर जोरदार टीका होत आहे.”

हेही वाचा – “काँग्रेस फक्त हरल्यानंतर फोडते ईव्हीएमवर खापर”; भाजपाचा आरोप

“भाजप आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे दयेवर आहे. जर #INDIA आघाडीनेने त्यांच्यापैकी एकाला पद दिले तर ते पक्षांतर करू शकतात का?

“नितीश जी सबके है” म्हणत एकाने मीम्स शेअर केले आहे. सोशल मिडियावर एकापेक्षा एक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहे.