मुंबईत ७१ हजारांहून अधिक ‘नोटा’चा वापर

पूर्व उपनगरांतील अणुशक्ती नगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे तीन हजार ८८४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे

71000 nota used in mumbai in Maharashtra Assembly poll
मुंबईत ७१ हजारांहून अधिक ‘नोटा’चा वापर loksatta team

मुंबई : भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीने मुंबईमध्ये २२ मतदारसंघात विजय मिळवून सरशी केली आहे. महायुतीला घसघशीत यश मिळाले असले तरी मुंबईमधील विविध मतदारसंघांतील ७१ हजार ९१२ मतदारांनी मतदानाच्या वेळी ‘नोटा’चा पर्याय निवडून सर्वच उमेदवारांना नाकारल्याचे उघडकीस आले आहे.

पूर्व उपनगरांतील अणुशक्ती नगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे तीन हजार ८८४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) फहाद अहमद यांचा पराभव केला. मुलुंड मतदारसंघात ३,८३४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती देत उमेदवारांना नाकारले. धारावीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड परिसरातील भूखंड देण्याच्या हालचालींमुळे बहुसंख्य मुलुंडकर नाराज आहेत.

हेही वाचा >>> मुंबईतील ३४५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त; युती, आघाडीच्या लढतीत अपक्ष दुर्लक्षित ; ७५ उमेदवारांनी अनामत रक्कम राखली

ही नाराजी ‘नोटा’च्या रूपात मतपेटीत बंद झाली. परंतु असे असले तरी बालेकिल्ल्यातील मतदारांनी भाजपला साथ देत उमेदवाराला विजयी केले. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेस विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे) अशी लढत झाली. काँग्रेसने पुन्हा आमदार अमिन पटेल यांना उमेदवारी दिली होती, तर भाजप नेत्या शायना एन.सी. यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) उमेदवारी देऊन अमिन पटेल यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. मात्र या मुस्लीमबहुल मतदारसंघात पुन्हा अमिन पटेल यांच्या पारड्यात भरभरून मते पडली. या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १,११३ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Over 71000 nota used in mumbai for maharashtra assembly election 2024 print politics news zws

First published on: 25-11-2024 at 05:07 IST

संबंधित बातम्या