शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या महाविकास आघाडीने राज्यात ३० जागा जिंकून अनपेक्षपणे मुसंडी मारली. ४५ पारचा नारा दिलेल्या महायुतीला केवळ १७ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. राज्यात भाजपाला मोठा फटका बसला असून काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. तर, शिंदे गटाने अवघ्या ७ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाची राज्यात झालेली पिछेहाट पाहता आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सर्वेमुळे सर्वांत मोठं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लोकसभेच्या निकालाबाबत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. परंतु, आम्हाला इतरांवर टीका करण्यापेक्षा आमच्या चुका दुरुस्त करणं गरजेचं वाटतं. खऱ्या अर्थाने जागा वाटपात सर्व्हे हा केंद्रबिंदू होता. या सर्व्हेच्या नावाखाली अनेक जागा बदलल्या गेल्या. त्यामुळे नुकसान झालं आहे. प्रत्येकाने सर्व्हे आणले. सर्व्हेमुळे आम्हाला अतिआत्मविश्वास आला होता, त्यामुळे आम्हाला फटका बसला आहे”, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पराभव मान्य केला आहे.

आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे

“जागा वाटप झाल्यावरही शेवटच्या क्षणाला उमेदवाराला कमी वेळ मिळतो. तेव्हा मतदारांपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक राजकारण घडलेलं असतं. परंतु, स्पष्टपणे बोललं पाहिजे. कधीतरी यावर चर्चा झाली पाहिजे. राहिला निकालाचा प्रश्न तर फक्त आम्ही १५ पैकी ७ जागांवर जिंकलो आहोत. त्यानुसार, आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे”, अशीरी सारवासारव त्यांनी केली.

हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल; पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार

“महाविकास आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सर्वाधिक फायदा झाला. ज्यांची एक जागा होती, आता त्यांना १३ जागा मिळाल्या. म्हणून इतर लोक चमत्कार घडवला या अविर्भावात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उबाठाच्या उमेदवारांसाठी मनापासून काम केलं नाही. सांगलीचं ज्वलंत उदाहारण आहे”, असंही ते म्हणाले.

आता दिल्लीवाऱ्या सुरू झाल्यात

“उबाठा गट २२ पैकी ९ जागांवर यशस्वी ठरला. त्यामुळे १३ जागा कशा पडल्या यावर मनन-चिंतन करण्याची गरज आहे. वंदनीय, आदरणीय, हृदयसम्राट राहुल गांधींच्या भेटीला ते आता जातील. हे दिल्लीच्या वाऱ्या करायला सज्ज झाले आहेत. सरकार कसं बनवायचं यावर ते विचार मांडतील”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >> मुंबईत आवाज ठाकरेंचा !

“जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीत जो कौल दिलाय तो मान्य करतोय. या चुका पुन्हा होणार नाही, तो पुन्हा होणार नाही. हा सेट बॅक आम्ही विधानसभेत भरून काढू”, असं म्हणत त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबतही सूचक विधान केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overconfidence hit us sanjay shirsatas statement about loksabha election result in discussion sgk
Show comments