उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मुबारखपुर येथे ‘एमआयएम’ चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रचार सभेतील भाषणा बोलताना पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींचे वर्णन केले. “ओवेसी को फ्लावर समझे क्‍या, फ्लावर नहीं फायर हैं… फायर”, असं वारिस पठाण यांनी बोलून दाखवलं. तसेच, हे म्हटल्यानंतर पुष्पा चित्रपटातील नायक अल्लु अर्जुन प्रमाणे वारिस पठाण यांनी अॅक्टींगही केल्याचे दिसून आले. वारिस पठाण यांचा या भाषणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ओवेसींच्या वाहनावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा देखील उल्लेख केला आणि आम्ही कुणाला घाबरणार नाही आणि कुणापुढे झुकणारही नाही. आपल्या हक्कासाठी लढत राहू. हा लढा आम्ही संविधानाच्या कक्षेत राहून लढू. असं बोलून दाखवलं

सरकारवर हल्लाबोल –

वारिस पठाण यांनी जाहीर सभेत बोलताना सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी सपा आणि इतर पक्षांवरही टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. आता हक्कासाठी कुणासमोर आपण झुकणार नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owaisi is not a flower it is a fire waris pathan msr