Lok Sabha Election Result Updates: लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांना असदुद्दीन ओवैसी यांना हैदराबादचा गड राखण्यात काहीही अडचण येणार नाही असं दिसतं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपाच्या माधवी लता यांनी आघाडी घेतली होती. मात्र माधवी लता या आता दोन लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत. त्यामुळे असदुद्दीन ओवैसी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधवी लता काय म्हणाल्या होत्या?

“आज सगळा देश निकालाची वाट पाहतो आहे, मोदींचं कमॅबक होणार आहे. फक्त देशच नाही तर सगळ्या जगाला निकालाची प्रतीक्षा आहे. मला खात्री आहे की निकाल आमच्या बाजूनेच लागेल आणि मोदी हे ४०० पार जात पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करतील. हैदराबादमधला निकालही माझ्याच बाजूने लागेल अशी मला खात्री वाटते, लोकांनी न्यायाच्या बाजूने मतदान केलं आहे त्यामुळे निकालही तसाच लागेल याची मला खात्री आहे” असं माधवी लता म्हणाल्या होत्या. मात्र तसं होताना दिसत नाहीये हे वास्तव आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : भाजपाला मोठा धक्का; नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांची निर्णायक आघाडी; निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

हैदराबादच्या जागेच्या इतिहास

हैदराबाद हा लोकसभा मतदारसंघ चार दशकांपासून ओवैसी कुटुंबाकडे आहे. असदुद्दीन ओवैसींचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी १९८४ ते २००४ या कालावधीत याच मतदारसंघातून खासदार होते. तर सध्याच्या घडीला एआयएमआयएमचे प्रमुख चौथ्यांदा या जागेवरुन निवडून गेले आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिल्याने त्या चर्चेत आल्या.

Lok Sabha Election Results Live Updates : देशात घडामोडींना वेग, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा चंद्राबाबू नायडू यांना फोन

माधवी लता कोण आहेत?

माधवी लता या हैदराबादच्याच रहिवासी आहेत. त्यांचे वडील मिलट्री इंजिनिअरींग सर्व्हिसमध्ये होते. एक उत्तम वक्त्या अशी त्यांची ओळख आहे. माधवी लता यांनी हैदराबादच्या निजाम कॉलेजातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी एम. ए. ची डिग्री या महाविद्यालयातून घेतली आहे. माधवी लता या भरतनाट्यम नृत्यही करतात. तसंच त्यांना चित्रकलेचीही आवड आहे. समाजसेवा करणं हीदेखील त्यांची आवड आहे. अनेक व्हिडीओंतून त्या भजन गातानाही दिसतात. एकही मूल रडत शाळेत जाऊ नये यासाठी त्या कार्यरत आहेत. माधवी लता जिंकून येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र भाजपाची ही खेळी अयशस्वी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owaisi will win his seat in hyderabad madhavi lata trailing by over two lakh votes in loksabha election 2024 scj