Palghar Assembly constituency : पालघर विधानसभा मतदारसंघ १० वर्षांपासून शिवसेनेकडे, येत्या निवडणुकीत काय होणार?

२०१९ मध्ये श्रीनिवास चिंतामण वनगा हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले, आता या निवडणुकीत काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Palghar Vidhan Sabha News
पालघरमध्ये काय आहे राजकीय स्थिती? (फोटो-लोकसत्ता)

पालघर विधानसभा मतदारसंघ – १३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पालघर मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील कासा आणि चिंचणी ही महसूल मंडळे आणि पालघर तालुक्यातील तारापूर, पालघर ही महसूल मंडळे आणि पालघर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पालघर हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

पालघर मतदारसंघ दहा वर्षांपासून शिवसेनेकडे

पालघर हा मतदारसंघ मागच्या दहा वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. २०१९ मध्ये श्रीनिवास चिंतामण वनगा हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. तर २०१४ या निवडणुकीत कृष्णा अर्जुन घोडा हे आमदार होते. त्याआधीच्या निवडणुकीत म्हणजेच २००९ मध्ये काँग्रेसचे राजेंद्र धेड्या गावित निवडून आले होते. आपण मागच्या तीन निवडणुकांची स्थिती काय होती जाणून घेऊ.

Akkalkuwa Constituency, Heena Gavit, Lok Sabha,
लोकसभेतील पराभूत डॉ. हिना गावित यांची अक्कलकुवा मतदारसंघात तयारी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Chinchwad Assembly, Opposition to Jagtap family, BJP,
चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबाला भाजपमधून विरोध; माजी नगरसेवकांचा ठराव! म्हणाले तरच आम्ही…
brahmapuri assembly constituency
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ : विजय वडेट्टीवारांना पक्षांतर्गत संघर्षाचा फटका बसणार?
Mahavikas Aghadi contests, Vasai,
वसईवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच
aheri assembly constituency
Aheri Assembly Constituency : अहेरी विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धर्मरावबाबा आत्रामांना शह देण्यात यशस्वी ठरणार?
Exchange of assembly seats in Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीत जागांची आदलाबदल ?
Nandurbar Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Nandurbar Vidhan Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याचा परिणाम विधानसभेच्या रणधुमाळीत दिसणार का ?

पालघरमधली २००९ ची राजकीय परिस्थिती काय?

२००९ काँग्रेसचे राजेंद्र गावित या मतदारसंघातून निवडून आले. त्यांना ५५ हजार ६६५ मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात प्रमुख लढत होती ती शिवसेनेच्या मनिषा निमकर यांची. मात्र त्यांना या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली जी ३४ हजार ६९४ होती.

२०१४ मध्ये काय घडलं?

२०१४ मध्ये शिवसेनेने या ठिकाणी बाजी मारली. अर्जुन घोडा यांनी राजेंद्र गावित यांचा पराभव केला. कृष्णा घोडा यांना ४६ हजार १४२ मतं मिळाली. तर राजेंद्र गावित यांना ४५ हजार ६२७ मतं मिळाली. अवघ्या ५१५ मतांनी शिवसेनेचे उमेदवार कृ्ष्णा घोडा विजयी झाले. मात्र नंतर शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना तिकिट दिलं आणि २०१९ ला ते निवडून आले.

२०१९ ला काय स्थिती होती?

पालघर मतदारसंघातून श्रीनिवास चिंतामण वनगा निवडून आले. त्यांना ६८ हजार ४० मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या योगेश नाम यांना २७ हजार ७३५ मतं मिळाली. श्रीनिवास वनगा यांच्या विजयात मोठा वाटा भाजपाचा होता. कारण भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपाचे श्रीनिवास वनगा हे शिवसेनेत गेले. त्यांना शिवसेनेने पालघरमधून तिकिट दिलं. भाजपा आणि शिवसेनेने त्यांना निवडून आणण्यासाठी एकत्रित मेहनत घेतल्याने ते विजयी झाले.

पालघरची सीट आणि मुख्यमंत्रिपद अर्धे अर्धे वाटून घेण्याची चर्चा

महाराष्ट्रात २०१९ मध्ये पालघरच्या जागेवरुन घडलेली घडामोड ऐतिहासिक होती. श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने तिकिट दिल्यानंतर ही जागा भाजपाने एका अटीवर सोडली होती. २०१९ च्या निवडणूक प्रचाराच्या आधी अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर चर्चा झाली. मातोश्रीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय झाल्याचा संदर्भ उद्धव ठाकरे सांगत असतात. मात्र अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा संदर्भ कायमच नाकारला आहे. पालघरची जागा भाजपाची होती. ती शिवसेनेला द्यायची त्याबदल्यात शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडणार हे ठरलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पालघरची जागा भाजपाने सोडली नसती तर ती शिवसेनेला मिळाली नसती हेदेखील तेवढंच खरं आहे.

लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये काय घडलं?

पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत विष्णू सावरा यांचा विजय झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला. सावरा यांना ६ लाख १ हजार २४४ मतं मिळाली. तर कामडी यांना ४ लाख १७ हजार ९३८ मतं मिळाली. आता २० नोव्हेंबरला निवडणूक होते आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पालघर विधानसभेसाठी कुणाला तिकिट मिळणार? आणि कोण निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

१०० वर्षांपूर्वी पालघर हे खेडेगाव होतं

१०० वर्षांपूर्वी पालघर हे ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील एक छोटे खेडेगाव होते. इ.स. १८९३ साली हल्लीची वेस्टर्न रेल्वे म्हणजे पूर्वीची बॉंम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे B.B.&.C.I पालघरवरून जात असल्याने पालघर रेल्वे स्थानक झाले. इ.स. १८९० पासून प्लेग-मलेरियाच्या साथीमुळे व रेल्वेच्या सोयीमुळे केळवा माहीम गावातील श्रीमंत लोक पालघरला स्थाईक होऊ लागल्याने गाव वाढू लागले. इ.स. १९१८ साली, १० मार्चला तालुका कचेरी माहीमहून पालघरला आली. १९२३ साली पालघर कचेरीची हल्लीची इमारत बांधली गेली.

१९१८ मध्ये पालघरला झाली लोकमान्य टिळकांची सभा

१९१८ साली लोकमान्य टिळकांची पालघर येथे सभा झाली. रेल्वेमुळे गुजराथशी दळणवळण वाढल्याने अनेक गुजराती व्यापारी पालघरमध्ये स्थायिक झाले. रेल्वेच्या कामासाठी आलेले उत्तरभारतीय ब्राह्मण समाज पालघरला स्थिरावला इ.स. १९२० साली व्यंकटेश ॲंग्लो व्हर्नाक्युलर हायस्कूल या संस्थने शाळा काढली. तिचेच रूपांतर नंतर आर्यन हायस्कूलमधे झाले. इ.स. १९२३ मध्ये पालघर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. मात्र त्यावेळी मर्यादित लोकांनाच मतदानाचा अधिकार होता.

१९३० च्या आसपास काय स्थिती?

इ.स. १९३० च्या आसपास मुंबईतील म्हशींच्या गोठ्यांना व घोड्यांच्या तबेल्यांना पालघर येथून गवताचा पुरवठा होऊ लागला व पालघरातील शेतकरी लोकांना एक नवीन फायदेशीर धंदा मिळाला. १४ ऑगस्ट १९४२ रोजी “चलेजाव” आंदोलनात काढलेल्या मोर्चावरती पालघरमध्ये गोळीबार होऊन पाच तरुण मृत्यू पावले. त्यांच्या स्मरणार्थ आजचा हुतात्मा चौक बांधला आहे. हिंदुस्थानच्या फाळणीमुळे इ.स.१९४८ मध्ये पालघरमध्ये सिंधी लोकांचे आगमन झाले. इ.स.१९५२ मध्ये ग्रामपंचायतीत सर्वांना मताधिकार मिळाला. इ.स.१९५९ मध्ये पंचायत समितीची स्थापना झाली. इ.स.१९८० पासून पालघरच्या आजूबाजूला उद्योगधंदे सुरू झाले. उद्योगधंद्यांच्या आगमनांमुळे पालघरची लोकसंख्या सतत वाढत आहे. इ.स. १९९० च्या आसपास निवासासाठी मोठ्या इमारती बांधणे सुरू झाले. इ.स. १९९८- पालघर नगरपरिषदेची स्थापना. इ.स. २०१३ पासून लोकल रेल्वे सुरू होऊन पालघरचे रूपांतर मुंबईच्या उपनगरात झाले. १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्‌घाटन झाले.

पालघरला वारली चित्रकलेचा वारसा

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोळी महादेव, कातकरी, कोळी मल्हार, कोकणा-कोकणी, दुबळा, धोडिया, टोकरे- कोळी वारली इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी सामाज्याने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे . वारली चित्रकला या जिल्ह्याने वारसा म्हणून जतन केलेली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Palghar assembly constituency what will happen in upcoming vidhan sabha election scj

First published on: 18-10-2024 at 00:05 IST

संबंधित बातम्या