राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरू असून, प्रचार आता शिगेला पोहचला आहे. एकीकडे महायुतीने सत्तेत राहण्यासाठी प्रचाराची राळ उठवली आहे. तर, पुन्हा सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीही जोरदार तयारी करत आहे. दरम्यान परळी येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासमोरच, “विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी तुम्हाला डोळ्यांसमोर कमळ दिसेल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा,” अशा मिश्किल शैलीत कार्यकर्त्यांना आवाहन केले. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यामुळे यंदा परळी विधानसभेसाठी मुंडे भावंडांमधील संघर्ष टळला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

परळीतील या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “धनंजय विद्यमान आमदार आहे. त्यामुळे त्यालाच ही जागा मिळणार होती. मला महित आहे, मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रांवर तुम्ही कमळाचे बटनच शोधणार आहात. कारण तुमच्या डोक्यात कमळच बसले आहे. पण असू द्या, त्यादिवशी जा आणि घड्याळाचेच बटन दाबा. मला वाटते हे सगळे करण्यापेक्षा धनंजयने कमळच हातात घेतले असते तर बरे झाले असते.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

४० वर्षांनी परळीतून कमळ गायब

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही आहे. महायुतीमध्ये ज्या मतदारसंघांत ज्यांचा आमदार ती जागा त्या पक्षाला असा ठराव झाल्याचं सांगितलं जातं. त्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. कारण गेल्यावेळी इथून धनंजय मुंडे विजयी झाले होते. यंदा ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे ४० वर्षांत पहिल्यांदाच इथे कमळाच्या चिन्हावरील उमेदवार निवडणूक लढवणार नाही. १९७८ ची निवडणूक वगळता त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत परळीतून कमळाच्या चिन्हावर भाजप उमेदवार लढला होता.

काय होता २०१९ चा निकाल?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी मंत्री असलेल्या पंकजा मुंडे भाजपकडून मैदानात होत्या. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लढत होते. सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेल्या या लढतीत, अनपेक्षितपणे धनंजय मुंडे यांनी ३० हजारांहून अधिक मतांनी बाजी मारली होती. यामध्ये धनंजय मुंडेंना १,२२,११४ तर पंकजा यांना ९१,४१३ मते मिळाली होती.

Story img Loader