राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरू असून, प्रचार आता शिगेला पोहचला आहे. एकीकडे महायुतीने सत्तेत राहण्यासाठी प्रचाराची राळ उठवली आहे. तर, पुन्हा सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीही जोरदार तयारी करत आहे. दरम्यान परळी येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासमोरच, “विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी तुम्हाला डोळ्यांसमोर कमळ दिसेल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा,” अशा मिश्किल शैलीत कार्यकर्त्यांना आवाहन केले. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यामुळे यंदा परळी विधानसभेसाठी मुंडे भावंडांमधील संघर्ष टळला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा