बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ७ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. बीडमधील पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सद्यस्थिती काय? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून…

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Sunetra Pawar
Lok Sabha Election Result: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट, “निकाल अनपेक्षित….”
Devendra Fadnavis
Lok Sabha Election Reults : “आमच्या जागा कमी आल्या पण…”, भाजपाची पिछेहाट पाहून फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

बीडमध्ये यंदा चुरशीची लढत बघायला मिळाली. कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या, तर कधी बजरंग सोनवणे पुढे जात होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. महत्त्वाचे म्हणजे २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्याकडे ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून या आघाडीत घट होत गेली.

दरम्यान, २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली होती. तसेच २९ व्या फेरीत १ हजार २१७ मतांची, तर ३०व्या फेरीत २६०२ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, ३१ व्या फेरीत पंकजा मुंडे यांना पुन्हा ४०० मतांची आघाडी मिळाली. मात्र, मुंडे फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली, त्यांनी ७ हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

हेही वाचा – “आमच्या जागा कमी आल्या पण…”, भाजपाची पिछेहाट पाहून फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

यासंदर्भात बोलताना, ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती. मात्र, एवढी चुरशीची होईल, असं वाटलं नव्हतं. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती. तसेच निकाल काहीही लागो कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.