पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच पूर्वी १४ वर्षांचा वनवास असायचा. मात्र हा पाच वर्षांचा वनवास पुरे असं म्हटलं होतं. तो वनवास भाजपाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आल्यानंतर संपला आहे. कारण पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून आता लोकसभा लढवतील. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी २० नावांची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. एकीकडे पंकजा मुंडेंचा वनवास संपला आहे, मात्र प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे ११ मार्चला काय म्हटल्या होत्या?

“एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, म्हटलं वनवास पाचच वर्षांचा असावा या युगात बाबा. जुन्या काळात १४ वर्षांचा वनवास होता, आम्हाला पाच वर्षांचा वनवास पुरे झाला की तुम्हाला अजून पाहिजे? तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर? मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहिलं आहे, आत्तापर्यंत काय लिहिलं होतं? तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार बोलत नाही. पण मी फार दुःख, यातना, वेदना भोगून झाल्या आहेत. सगळं काही भोगूनही मी चेहरा हसरा ठेवते. याचं कारण तुम्ही म्हणजेच माझे सगळे कार्यकर्ते आहात.”

पंकजा मुंडे २०१९ ची विधानसभा निवडणूक हरल्या

पंकजा मुंडे या विधानसभेची २०१९ ची निवडणूक हरल्या होत्या. त्यानंतर त्यांना साईड ट्रॅक करण्यात आल्याच्या चर्चा वारंवार रंगल्या. इतकंच काय त्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जातील अशाही चर्चा रंगल्या. मात्र पंकजा मुंडे यांनी कुठल्याही चर्चांकडे लक्ष न देता आपली वाटचाल करणं सुरु ठेवलं. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांचा पाच वर्षांचा वनवास आता संपला आहे. असं असलं तरीही पंकजा मुंडेंची सख्खी बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकिट मात्र कापण्यात आलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

पंकजा महाराष्ट्रातल्या आक्रमक नेत्या

पंकजा मुंडे या महाराष्ट्रातल्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. २०१४ मध्ये त्यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभाग सोपवण्यात आला होता. त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोपही त्या काळात झाले होते. मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी सभागृहात वारंवार आक्रमकपणे उत्तर दिलं होतं. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्या हरल्या होत्या. त्यांच्या विरोधात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे निवडून आले होते. ही लढत खूप चुरशीची झाली होती. पंकजा मुंडे या मागच्या पाच वर्षांपासून भाजपासाठीच कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याबाबत विविध चर्चा झाल्या. मात्र कुठल्याही चर्चांकडे लक्ष न देता त्यांनी पक्षाविषयीची निष्ठा कायम ठेवली. त्यांना आज लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाने प्रीतम मुंडेंना लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना संधी दिली आहे. त्यामुळे उमेदवारी एकाच घरात राहिली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde name in lok sabha candidates maharashtra list but pritam munde name has been dropped elections scj