Pimpri Assembly Constituency Election 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे मतदारसंघातील दौरे सुरु असून मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला जात आहे. कारण ही विधानसभेची निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. आता निवडणूक जाहीर होताच पुण्यातील पिंपरी विधानसभा (Pimpri Assembly Constituency) मतदारसंघातही घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे (Anna Bansode) हे विद्यमान आमदार आहेत.

मागील काही वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे याचा परिणाम स्थानिक राजकारणातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातील जनता कोणाला कौल देणार? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे थोड्या दिवसांत कळणार आहे.

Pimpri Legislative Assembly, Anna Bansode, Shilwant Dhar
पिंपरी विधानसभा : अखेर ठरलं, अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या शिलवंत-धर यांच्यात लढत
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Chinchwad Assembly constituency
Chinchwad Assembly Constituency Election 2024: चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार; भाजपाच्या गडाला मविआ सुरुंग लावणार का?
fight in Pimpri-Chinchwad and Maval is clear
पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

हेही वाचा : Chinchwad Assembly Constituency : चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार; भाजपाच्या गडाला मविआ सुरुंग लावणार का? कसं आहे राजकीय गणित?

विधानसभेच्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातही उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु होती. महायुतीत हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे आहे. अण्णा बनसोडे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघामध्ये महायुतीमधील अजूनही काही नेते इच्छुक असल्याचं बोललं जात होतं. काहींनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसही या मतदारसंघांवर दावा करत होतं. इतकंच काय तर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या होत्या. यामध्ये अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती.

दरम्यान, पिंपरी विधानसभेचं प्रतिनिधित्व अण्णा बनसोडे करत आहेत. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता. पिंपरी मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आता महायुतीत विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला असल्यांमुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली आहे. आता पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देते? महाविकास आघाडीला की महायुतील? या निवडणुकीत कोण बाजी मारतं? हे आता पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

मतदारांची संख्या

पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे येथून निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांना ८६,९८५ मतदान मिळाले होते, तर गौतम चाबुकस्वार यांना ६७,१७७ मतदान झालं होतं. या निवडणुकीत अण्णा बनसोडे हे विजयी झाले होते, तर गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला होता. दरम्यान, सध्या पिंपरी विधानसभा मतदारांची एकूण संख्या ३ लाख ६४ हजार ८०६ एवढी आहे.