Pimpri Assembly Constituency Election 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला होता. अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली होती. अनेक नेत्यांनी मतदारसंघातील दौरे करत मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला. कारण ही विधानसभेची निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आता निवडणूक जाहीर होताच पुण्यातील पिंपरी विधानसभा (Pimpri Assembly Constituency) मतदारसंघातही घडामोडी वाढल्याचं पाहायला होतं. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे (Anna Bansode) हे विद्यमान आमदार होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील काही वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे याचा परिणाम स्थानिक राजकारणातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातील जनता कोणाला कौल देणार? महायुतीला की महाविकास आघाडीला? हे आता स्पष्ट झालं असून या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचा पुन्हा एकदा मोठा विजय झाला आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा पराभव झाला.

हेही वाचा : Chinchwad Assembly Constituency : चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार; भाजपाच्या गडाला मविआ सुरुंग लावणार का? कसं आहे राजकीय गणित?

विधानसभेच्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातही उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु होती. महायुतीत हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे आहे. अण्णा बनसोडे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघामध्ये महायुतीमधील दुसरे काही नेते इच्छुक होते. काहींनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसही या मतदारसंघांवर दावा करत होतं. इतकंच काय तर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या होत्या. यामध्ये अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती.

दरम्यान, पिंपरी विधानसभेचं प्रतिनिधित्व अण्णा बनसोडे करत आहेत. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता. पिंपरी मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आता महायुतीत विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला असल्यांमुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली. तसेच पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनेही त्यांना कौल दिला.

२०१९ ची मतदारांची संख्या

पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे येथून निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांना ८६,९८५ मतदान मिळाले होते, तर गौतम चाबुकस्वार यांना ६७,१७७ मतदान झालं होतं. या निवडणुकीत अण्णा बनसोडे हे विजयी झाले होते, तर गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला होता. दरम्यान, सध्या पिंपरी विधानसभा मतदारांची एकूण संख्या ३ लाख ६४ हजार ८०६ एवढी आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झालं?

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३,९१,६०७ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २,०४,००५, महिला मतदार १,८७,५६८ आणि तृतीयपंथी ३४ मतदार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत ५१.२९ टक्के मतदान झालं.