छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील भानुप्रतापपूर विधानसभा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. भाजपा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही. ते फक्त अदाणींचं कर्जमाफ करू शकतात. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आम्ही पाळलं. आता पुन्हा एकदा छत्तीसगडमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं राहुल गांधी म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, जमा केले नाहीत. मी अशी खोटी आश्वासने देणार नाही. मी जे बोलतो, तेच करतो,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
हेही वाचा : तेलंगणात अमित शाहांची मोठी घोषणा, निवडणूक जिंकल्यास मागासवर्गीय समाजातील नेत्याला मुख्यमंत्रिपद!
दोन-तीन उद्योगपतींसाठी भाजपा काम करते, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. “आमचं सरकार शेतकरी, कामगार आणि गरिबांना मदत करते. दुसरीकडे भाजपा सरकार मोठी-मोठी वक्तव्य करतात. पण, शेवटी अदाणींनाच मदत करते,” अशी टीका राहुल गांधींनी भाजपावर केली आहे.
“छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यास सरकारी शाळा आणि महाविद्यालयात मोफत शिक्षण दिलं जाईल. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणांत ओबीसी समाजाबद्दल बोलतात. मग, जातनिहाय जनगणना करण्यास का भीत आहे? काँग्रेस सत्तेत आल्यास देशात जातनिहाय जनगणना केली जाईल.”
हेही वाचा : ‘सपा’नंतर आता जदयू पक्षाचीही मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उडी; इंडिया आघाडीत काय चाललंय?
“भारताचे सरकार खासदार नाही तर ९० सचिव चालवत आहेत. तेच, देशाचं अर्थसंकल्प ठरवतात. ९० सचिवांमध्ये फक्त तीन ओबीसी आहेत. देशात ५० टक्के ओबीसी समाज आहे. पण, पंतप्रधान मोदी ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाची लोकसंख्या लपवण्याचं काम करत आहेत,” असा आरोपी राहुल गांधींनी केला आहे.