PM Narendra Modi Oath taking Ceremony on 8 June 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं आहे, मात्र बहुमत एनडीएला मिळालं आहे. अशातच नरेंद्र मोदी हे सरकार स्थापन करणार आणि ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील अशी शक्यता आहे.

नरेंद्र मोदींच्या नावावर विक्रम नोंदवला जाणार

सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर त्यांच्यावर नवा विक्रम नोंदवला जाईल. सलग तीनदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा विक्रम हा पंडीत नेहरुंच्या नावावर होता. ज्यानंतर मोदी हे त्या विक्रमाशी बरोबरी करु शकतात. आज दुपारी ४ वाजता एनडीएची बैठक बोलवण्यात आली आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू, जदयू चे प्रमुख नितीश कुमार आणि इतर घटक पक्ष सहभागी होणार आहेत. एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होईल. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि नरेंद्र मोदींचा शपथविधी याबाबत चर्चा होईल.

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

PM Narendra Modi Speech: निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी भावूक, “सगळ्या देशवासीयांचे आभार, मी पुन्हा…”

नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू दिल्लीत

जदयूचे नेते नितीश कुमार बुधवारी सकाळी दिल्लीत पोहचले आहेत. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशात मोदींचा शपथविधी ८ जून रोजी असू शकतो अशी माहिती समोर आली आहे. चंद्रबाबू नायडूही अगदी काही वेळात दिल्लीत पोहचणार आहेत. २०१४ मध्ये एनडीएसह भाजपाचं सरकार आलं तेव्हा १० दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. तर २०१९ च्या निकालानंतर सात दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. आता यावेळी ८ जून रोजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : भाजपा आजच सत्तास्थापनेचा दावा करणार, इंडिया आघाडीचीही बैठक सुरू

लोकसभेचा निकाल काय?

लोकसभा निवडणुकीत एनडीएने भाजपासह २९३ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. त्यांचे सात अपक्ष उमेदवारीही निवडून आले आहेत. आज संध्याकाळी इंडिया आघाडीचीही बैठक दिल्लीत पार पडते आहे. या बैठकीनंतर त्यांची पुढची रणनीती काय हे समोर येणार आहे.

भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये कशी कामगिरी केली?

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला हात आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. आता या यावेळी ४४१ पैकी ३७० जागा भाजपा जिंकतंय का हे आज स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाला जी मतं मिळाली त्याची सरासरी २०१४ च्या तुलनेत अधिक होती. २०१९ मध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा ६९ टक्क्यांवर पोहचला होता. या तुलनेत आत्ताचा निकाला