Shiv Sena Uddhav Thackeray Lok Sabha Election Result : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर सतत टीका करण्यात येत होती. त्यांच्या गटाला नकली शिवसेना म्हटले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंची नकली संतानही म्हटले होते. असली आणि नकली या शब्दांवरून प्रचारात जोरदार वादावादी झाली. पण आता निकालात उद्धव ठाकरेंनी भाजपाला जोरदार धक्का दिल्याचे दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाने २१ जागांवर निवडणूक लढवली होती. दुपारी २.३० वाजेपर्यंत त्यांनी ११ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपाने २८ जागांवर निवडणूक लढविली होती, पण त्यांना केवळ १२ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. भाजपा आणि शिवसेना जवळपास समसमान जागांवर आघाडी घेऊन आहेत.

भाजपा आणि शिवसेनेच्या लढतीकडे संपूर्ण देशचे लक्ष आहे. २५ वर्ष युतीत काढल्यानंतर शिवसेनेने भाजपापासून फारकत घेतली होती. मागच्या पाच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांनी भाजपाविरोधात लढा दिला. इंडिया आघाडीतही त्यांना मानाचे स्थान मिळाले. आता निकालात आघाडी घेऊन उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे स्थान आणखी पक्के केले आहे.

महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis ,
दादांची अनुपस्थिती, ठाकरेंचे आगमन अन् फडणवीसांची भेट अधिवेशनात काय घडले..

भाजपाला मोठा धक्का; नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांची निर्णायक आघाडी

कोण किती जागा लढवत आहे?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा २८, शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ आणि रासप १ जागा लढवत आहे. तर मविआमध्ये शिवसेना उबाठा २१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० आणि काँग्रेस १७ जागांवर लढत आहे.

२०१९ साली काय चित्र होते?

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी त्यांनी १८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. मात्र २०१९ साली महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी युती तोडली. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक फोडून स्वतःचा वेगळा गट स्थापन केला. यावेळी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार गेले. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर
दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार अरविंद सावंत, ठाण्याचे राजन विचारे, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील विनायक राऊत, धाराशिवमधील ओमराजे निंबाळकर आणि परभणीमधील संजय जाधव हे पाच खासदार उरले.

ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय जवळपास निश्चित, राजन विचारे मोठ्या फरकाने पिछाडीवर

पाच खासदार असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून २१ जागा मिळविल्या. तर एकनाथ शिंदे गटाला केवळ १५ जागा मिळू शकल्या. त्यातही त्यांच्यावर काही मतदारसंघाचे उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. यवतमाळ, हिंगोली मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाला उमेदवार बदलावे लागले. तसेच नाशिक, ठाणे हे मतदारसंघ मिळविण्यासाठी शिंदे गटाला भाजपावर दबावतंत्राचा वापर करावा लागला.

नरेंद्र मोदी तब्बल दीड लाखांनी आघाडीवर, स्मृती इराणी लाखभर मतांनी पिछाडीवर

यंदाच्या निवडणुकीत असली शिवसेना आणि नकली शिवसेना हा वाद पेटवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचे म्हटले तर ते बाळासाहेब ठाकरे यांचे नकली संतान आहेत, अशीही टीका केली. यामुळे प्रचारात असली नकलीचा वाद रंगला. उद्धव ठाकरे यांच्याकडे पाचच खासदार उरल्यामुळे त्यांच्याकडे फार गमविण्यासारखे नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना त्यांच्याबरोबर आलेल्या १३ खासदारांना जिंकून आणण्याचे आव्हान कायम आहे.

Story img Loader