संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापणं आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणं हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला देशात बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर स्वत:चं संविधान लागू करायचं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच काँग्रेस जाती जातीत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोपही त्यांनी केला. नांदेडमधील महायुतीच्या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर लाल पुस्तकांचे वाटप करत आहेत. त्यावर भारताचे संविधान असं लिहिलं आहे. मात्र, त्या पुस्तकाची पान कोरी आहेत. निवडणुकीच्या प्रचारात खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापणं आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणं हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

“काँग्रेसच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांप्रती द्वेष”

“काँग्रेसला देशात बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर स्वत:चं संविधान लागू करायचं आहे. हाच प्रयत्न त्यांनी आणीबाणीच्या काळात केला होता. काँग्रेसच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांप्रती द्वेष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काँग्रेसने काश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही. तिथे कलम ३७० द्वारे वेगळा कायदा लागू केला. त्यांनी तेथील दलितांना कोणतेही अधिकार दिले नाहीत, आज हेच लोक दलितांच्या हक्काच्या आणि संविधान रक्षणाच्या गोष्टी करत आहेत”, असेही ते म्हणाले.

“१० वर्षांपासून काँग्रेसचा जनाधार कमी”

गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसचा जनाधार कमी होतो आहे. कारण दलित, आदिवासी, अनुसुचित जाती जमाती आणि ओबीसी एकत्र आहेत. १० वर्षांपूर्वीपर्यंत या जातीचं विभाजन होत होतं. ते काँग्रेससाठी फायद्याचं होतं. काँग्रेसलाही तेच हवं होतं. काँग्रेसने देशातील जाती-जातीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला. आज देशाला ओबीसी पंतप्रधान मिळाला आहे. हेच काँग्रेस पचणी पडत नाही. त्यामुळेच ओबीसींना जातींमध्ये विभागण्याचं काम काँग्रेस करते आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

हेही वाचा – VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

“मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचं मूळ काँग्रेस”

“महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्यात महायुतीचे सरकार असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनेतेने काँग्रेसचे शासन दीर्घकाळ बघितलं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचं मूळ काँग्रेस आहे. त्यांनी कधीही येथील शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही. दुसरीकडे महायुतीने अनेक विकास प्रकल्प सुरू केले. शेतकऱ्यांना शेतपीकांसाठी पाणी देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं. आम्ही महाराष्ट्रात ११ सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. शेतकऱ्यांचे हित हीच आमची प्राथमिकता आहे”, असेही ते म्हणाले.