Premium

मोदींनी वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज; गंगा पूजन आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेत झाले भावूक

पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

PM Narendra Modi Nomination News
पंतप्रधान नरेंद्र मोदी, (फोटो-नरेंद्र मोदी ट्विटर)

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडले आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. आज नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी गंगेचे पूजन केले आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याआधी गंगा पूजन करत वाराणसीबरोबरचे गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध आठवत शेअर केले. पंतप्रधान मोदी यावेळी काहीसे भावूक झाले होते. मोदींनी यावेळी भावना व्यक्त करताना आई गंगा मातेने मला दत्तक घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली. काशीशी असलेले ऋणानुबंध सांगतानाही मोदी भावूक झाले. तसेच लोकांचे माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस आणखी वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

pm narendra modi interacted online with around one lakh booth chiefs
मतदारांशी प्रेमाने संवाद साधा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील बूथप्रमुखांना अनेक सूचना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
mla maulana mufti ismail vs asif sheikh maharashtra assembly election 2024
लक्षवेधी लढत : धार्मिक वलय मौलाना मुफ्ती यांना किती उपयुक्त?
Kiren Rijiju claim that the book on the Constitution is a hole for Congress nashik news
संविधानाविषयीच्या पुस्तकातून काँग्रेसची पोलखोल – किरेन रिजिजू यांचा दावा
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

हेही वाचा : “भाजपा ४०० पार जाणारच!” अजूनही नरेंद्र मोदी ठाम

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

“बाबा विश्वनाथांच्या नगरीतील देवरूप जनतेला वंदन आणि नमस्कार! आज माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण हा काशीच्या प्रत्येक कणाला नमस्कार करत आहे. आजच्या रोड शोमध्ये मला तुमच्या सर्वांकडून मिळालेला स्नेह आणि आशीर्वाद खूप अतुलनीय आहेत. त्यामुळे मी भारावून गेलो आहे आणि काहीसा भावूकही झालो आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या सावलीत १० वर्षे कशी गेली कळलेच नाही. गंगा मातेने मला बोलावले होते. आज आई गंगेने मला दत्तक घेतले आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

पंतप्रधान मोदींनी अर्ज दाखल केला, यावेळी वाराणसीमध्ये एनडीएमधील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह आदी भाजपाचे नेतेही उपस्थित होते.

दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. सर्वच रजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सभा, मेळाव्यांचा धडाका सुरू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत देशात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी विरूद्ध इंडिया आघाडी अशी लढत होत असल्याचे दिसत आहे. भाजपाने या निवडणुकीमध्ये ४०० पारचा नारा दिलेला आहे. याचा उल्लेखही अनेकदा पंतप्रधानांनी भाषणात केला. इंडिया आघाडीच्यावतीने देशात आघाडीचे सरकार येईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. असे असले तरी ४ जूनच्या निकालाकडे देशवाशीयांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi filed his election nomination form from varanasi lok sabha constituency gkt

First published on: 14-05-2024 at 14:26 IST

संबंधित बातम्या