राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत हिंदी भाषिक पट्ट्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्याचवेळी दक्षिणेकडे भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नसताना काँग्रेसनं तेलंगणामध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपासाठी लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व राज्यांमधील कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि नागरिकांचे आभार मानले. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका करण्याची संधी साधली.

“प्रलोभनं दाखवणं मतदारांना आवडत नाही”

या निवडणुकांच्या काळात ‘रेवडी’चा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळालं. त्यासंदर्भात बोलताना मोदींनी विरोधकांना टोला लगावला. “जिंकण्यासाठी हवेत गप्पा करणं आणि प्रलोभनं दाखवणं हे मतदारांना आवडत नाही. मतदारांना त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी स्पष्ट रोडमॅप हवा आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा

“२०२४ च्या हॅटट्रिकचीही गॅरंटी”

या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे या निवडणुकांमधल्या विजयामुळे भाजपासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मदत मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्याबाबत बोलताना मोदींनीही तोच विश्वास व्यक्त केला. “काही लोक तर म्हणत आहेत की आजच्या या हॅटट्रिकनं २०२४ सालच्या हॅटट्रिकची गॅरंटी देऊन टाकली आहे”, असं मोदी म्हणाले. “आजच्या विजयानं हेही सिद्ध केलंय की भ्रष्टाचार, भेदभावाचं राजकारण आणि घराणेशाहीबाबत आता देशात असहिष्णुता ठाम होऊ लागली आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

“ज्यांना भ्रष्टाचाऱ्यांच्या बाजूला उभं राहण्यात अजिबात संकोच वाटत नाही, त्यांना आज देशानं स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे. जे भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात, तपास यंत्रणांची दिवसरात्र बदनामी करत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावं की हे निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला मिळालेली जनतेची सहमतीच आहेत”, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.

“हे निकाल काँग्रेससाठी धडा”

दरम्यान, काँग्रेसला लक्ष्य करताना मोदींनी हे निकाल त्यांच्यासाठी धडा असल्याचं म्हटलं आहे. “हे निकाल काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीलाही मोठा धडा आहे. तो धडा हा आहे की फक्त काही कुटुंबांनी एकत्र येण्यामुळे फोटो कितीही चांगला आला, तरी देशाचा विश्वास जिंकणं अशक्य आहे. देशाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची इच्छा असायला हवी. घमंडिया आघाडीत ती तसूभरही दिसत नाही. शिवीगाळ, निराशा, नकारात्मकता यामुळे घमंडिया आघाडीला माध्यमांमध्ये मथळे मिळू शकतात, पण जनतेच्या मनात जागा मिळू शकत नाही”, असं ते म्हणाले.

“देशात फक्त चारच जाती महत्त्वाच्या”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विजयानंतर भाजपा मुख्यालयातील भाषणादरम्यान विधान!

“विरोधकांना हा धडा आहे, सुधरा नाहीतर…”

“आजचे निकाल त्या लोकांसाठीही इशारा आहे, जे प्रगती आणि लोककल्याणाच्या राजकारणाच्या विरोधात उभे राहतात. जेव्हा विकास होतो, तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी विरोध करतात. वंदे भारत रेल्वे सुरू करतो तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी चेष्टा करतात. अशा सर्व पक्षांना आज गरीबांनी इशारा दिला आहे. सुधरा. नाहीतर जनता तुम्हाला एकेकाला निवडून साफ करून टाकेल. आज अशा पक्षांसाठी हा धडा आहे की केंद्र सरकारच्या गरीब कल्याणच्या योजना आणि त्यासाठी पाठवलेल्या निधीच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर जो मध्ये येईल त्याला जनता बाजूला सारेल. लोकशाहीच्या हितासाठी माझा काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सल्ला आहे की कृपा करून असं राजकारण करू नका जे देशविरोधी शक्तींना ताकद देईल. देशात फूट पाडणाऱ्या लोकांना मजबुती देईल. देशाला कमकुवत करणाऱ्या विचारांना पाठबळ देईल”, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

Story img Loader