PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates, 9 June 2024 : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून ८००० निमंत्रित उपस्थित आहेत. ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी संपन्न होत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन यांनीही आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Narendra Modi Swearing-in Ceremony Delhi Rashtrapati Bhavan | नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन येथे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत

12:00 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Ceremony : अमित शाह ते रक्षा खडसे, भाजपाचे खासदार मोदींच्या निवासस्थानी पोहोचले

भाजपाचे नेते अमित शाह, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, अन्नपूर्णा देवी, अर्जून राम मेघवाल आणि रक्षा खडसे हे नरेंद्र मोदी यांच्या ७ केएलएम निवासस्थानी पोहोचले आहेत.

10:53 (IST) 9 Jun 2024
NDA Government Formation : शिंदे गटाचे प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेणार?

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे आज नरेंद्र मोदींसह मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांना मोदींच्या निवासस्थानी चहासाठी आमंत्रण मिळाले आहे.

10:32 (IST) 9 Jun 2024
नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये शिंदे गटाचे किती खासदार असणार? ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा!

देशात एनडीएने बहुमत प्राप्त केले असून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासबोतच ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा सविस्तर

10:31 (IST) 9 Jun 2024
Modi 3.0 : बहुमत गाठण्यासाठी मदत करणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना कोणती खाती मिळणार? ‘या’ मंत्रिपदांकडे लक्ष!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा आज सायंकाळी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ३० नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. या सत्तास्थापनेसाठी जनता दल (यु) आणि तेलगु देसम पक्ष या दोन पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती खाती जातील हे पाहावं लागणार आहे.

वाचा सविस्तर

10:07 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: ‘हे’ खासदार मोदींसह मंत्रिपदाची शपथ घेणार?

शपथविधी सोहळ्याआधी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळात अपेक्षित असलेल्या खासदारांना चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सकाळी ११.३० वाजता काही खासदारांना मोदींच्या निवासस्थानी बोलाविण्यात आले आहे. त्यामध्ये जेडीएसचे एचडी. कुमारस्वामी, जेडीयूचे रामनाथ ठाकूर, टीडीपीचे राम मोहन नायडू, टीडीपीचे आणखी एक खासदार पेम्मसनी चंद्रशेखर, माजी मंत्री सरबनंद सोनावल आणि भाजपाचे खासदार अर्जुन राम मेघवाल यांना चहापानासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

09:15 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: “नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर”, इंडिया आघाडीचे प्रयत्न

जनता दल युनायटेड (JDU) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली असा दावा जदयूचे नेते केसी त्यागी यांनी केला आहे. सविस्तर बातमी वाचा

09:13 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: कोणकोणत्या देशांचे नेते शपथविधीला उपस्थित राहणार?

शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदिव, भूटान, मॉरिशस, सेशल्स द्वीपसमूह या देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

09:11 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: काँग्रेस नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावणार?

आजच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण पाठविले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र काँग्रेसने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल.

09:08 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना कोणती खाती मिळणार?

सत्तास्थापनेसाठी जनता दल (यु) आणि तेलगु देसम पक्ष या दोन पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. सविस्तर बातमी वाचा

09:06 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: शपथविधीआधी नरेंद्र मोदी राजघाटावर महात्मा गांधींपुढे नतमस्तक

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील राजघाट येथे भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना काय मिळणार? (फोटो – ANI)

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना काय मिळणार? (फोटो – ANI)[/caption]