महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशोदरम्यान मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबईत ज्याप्रमाणे गणेशोत्सवाला गर्दी उसळते तशीच गर्दी पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान बघायला मिळाली. यावेळी महिला, वृद्ध आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

दरम्यान, या रोडशोनंतर आता पंतप्रधान मोदींनी मुंबईतील जनतेचे आभार मानले आहे. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नतील मुंबई घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“मुंबईतील भव्य अशा रोड शोमध्ये सहभागी झालेल्या आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेल्या प्रत्येकाचे विशेषतः महिला आणि बालकांचा मी आभारी आहे. मुंबईबरोबर आमच्या पक्षाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. याच शहरात १९८० साली आमच्या पक्षाची स्थापना झाली होती. त्यामुळे ही बाब आमच्या बांधिलकीला अधिकच बळकट करते”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

“उत्तम पायाभूत सुविधा आणि अधिक चांगल्या प्रकारचे ‘सुलभ राहणीमान’ या गोष्टी आमच्या दृष्टीने मुंबईच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळेच या महानगरातल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू झाली आहेत, ज्यामुळे भारताच्या वृद्धीला लक्षणीय ऊर्जा मिळत आहे”, असेही ते म्हणाले.

“या शहराला जोडणाऱ्या संपर्कव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि शहरातील कोंडी कमी करण्यासाठी अलीकडेच अटल सेतूचे राष्ट्रार्पण करण्यात आले. या प्रकल्पाची अगणित लोकांनी प्रशंसा केली आहे. याशिवाय मुंबईच्या जनतेला फायदेशीर ठरणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार भूमीगत मार्ग प्रकल्प यांचा समावेश आहे. आमचे सरकार शहरातील रस्त्यांचे एकंदर जाळे सुधारण्यासाठी सक्रियतेने काम करत आहे. या प्रकल्पांबरोबरच इतरही प्रकल्पांचा येथील लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – “खरी शिवसेना अन् राष्ट्रवादी एनडीएबरोबर, तर नकली पक्ष…”; मुंबईतील ‘रोड शो’दरम्यान पंतप्रधान मोदींची टीका!

“मराठीची लोकप्रियता वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध”

“मराठी अस्मितेशिवाय मुंबईचा विचारही करता येणार नाही. मराठी संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि मराठी भाषा लोकप्रिय करण्यासाठी विशेषतः युवा वर्गामध्ये तिची लोकप्रियता वाढवण्यासाठी मी व्यक्तिशः वचनबद्ध आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा यासाठी वापर करू आणि ही गोष्ट प्रत्यक्षात आणू”, असे आश्वासनही त्यांनी दिले.

काँग्रेसवरही केली टीका

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. “काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली, सेन्सॉरशिपला प्रोत्साहन दिले आणि मजरुह सुलतानपुरी आणि किशोर कुमार यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वांचा छळ केला. अशा लोकांकडून सर्जनशीलतेचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात घेण्याची अपेक्षा करता येणार नाही”, असे ते म्हणाले.

“बाळासाहेब यांच्या स्वप्नातली मुंबई साकारायची आहे”

“मुंबईसाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले ते साकार करण्यासाठी एनडीएमधील आमच्या सहकारी पक्षांसोबत आमचा पक्ष काम करेल. मुंबईचा वापर एखाद्या एटीएमप्रमाणे करणाऱ्या नेत्यांसारखे बाळासाहेब नव्हते, त्यांना या शहराची समृद्धी आणि भरभराट पाहायची होती. अगदी हेच आम्ही घडवून आणू”, असेही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – “नकली शिवसेनेत हिंमत असेल तर काँग्रेसच्या युवराजांकडून…”, कल्याणमधील सभेतून पंतप्रधान…

“आमचा जनाधार एका संधीसाधू आघाडीने चोरून नेला”

“२०१९ मध्ये महाराष्ट्रातील जनतेला एनडीए सरकार हवे होते पण आमचा जनाधार एका संधीसाधू आघाडीने चोरून नेला, ज्या आघाडीचे नेतृत्व प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक वैभवाची जास्त चिंता करणारे होते. जर आमचे सरकार पूर्ण कार्यकाळासाठी सत्तेवर राहिले असते, तर प्रकल्प अधिक जास्त वेगाने पूर्ण झाले असते. मात्र, विकासाचा मार्ग २०२२ मध्ये पुन्हा रुळावर आला. आगामी काळात त्यामध्ये वाढच होत जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Story img Loader