BJP Mega Maharashtra Campaign, Lok Sabha Election 2024 : चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढतो आहे, तसंच राजकीय वातावरणही तापतं आहे. मात्र तुमचा जोश, उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या वेळी चंद्रपूरने ठरवलं आहे फिर एक बार ४०० पारचा नाराही त्यांनी. चंद्रपूरने राम मंदिराच्या निर्मितीसाठी लाकडं पाठवली. संसदेच्या नव्या इमारतीतही चंद्रपूरचीच लाकडं आहेत असाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

उद्यापासून गुढीपाडवा नवं पर्व सुरु होतं आहे. सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२४ लोकसभा निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा आहे. एकीकडे भाजपा आणि एनडीए आहे. भाजपा आणि एनडीए देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेते आहे. दुसरीकडे आहे काँग्रेस आणि त्यांची इंडी आघाडी. सत्ता भोगा आणि मलई खा हे त्यांचं ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राशिवाय आणखी कुणाला जास्त समजणार? जोपर्यंत देशात देशात त्यांचं (इंडी आघाडी) सरकार होतं, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्राचा विकास या लोकांनी होऊ दिला नाही

जेव्हा यांनी महाराष्ट्रातली सत्ताही मिळवली तेव्हाही त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबांचा विकास केला. कोणाचा किती हिस्सा? कुठला ठेका कुणाला? मलईदार खाती कुणाला द्यायची? याचमध्ये महाराष्ट्राचा विकास त्यांनी (इंडी आघाडी) पणाला लावला. महाराष्ट्राच्या विकासाचा प्रकल्प आला की कमिशन हे मागायचे. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंचन योजना ठप्प केली. विदर्भाच्या विकासासाठी जो समृद्धी महामार्ग सुरु केला त्याचाही विरोध केला. कोकणात रिफायनरी प्रकल्पही रोखला. मुंबई मेट्रोचं कामही त्यांनी रोखलं होतं. गरीबांना घरं देणंही बंद केलं होतं. कमिशन द्या नाहीतर कामात खोडा घाला हेच यांचं लक्ष्य होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आपण वेगाने काम करतो आहोत. नियत चांगली असली की निकालही चांगले लागतात हे आपण पाहतोच आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या सभेत म्हणाले आहेत.

मी शाही घराण्यातून आलेलो नाही

मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही. तुम्हीच मला इथवर आणलं आहेत. ज्या लोकांकडे घरं नव्हती असे लोक दलित, वंचित, आदिवासी होते. त्यांच्याकडे पिण्याचं पाणी नव्हतं. रस्ते, शिक्षण, सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे मोदींनी गॅरंटी दिली होती की आमचं सरकार दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबाचं आयुष्य बदलण्यासाठी काम करणार. आम्ही ते काम करुन दाखवलं, खूप मेहनत घेतली आणि चार कोटी लोकांना घरं मिळवून दिली, हे सगळे याच वर्गांमधले लोक आहेत. उज्ज्वला सिलिंडर योजना मिळालेलेही लोक हेच आहेत असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress mva and uddhav thackeray in his chandrapur speech scj