पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून मोठा विजय झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात अटीतटीची लढाई शेवटपर्यंत पाहायला मिळाली. पण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ लाख १२ हजार ९७० मते मिळाली आहेत. तर अजय राय यांना ४ लाख ६० हजार ४५७ मते मिळाली आहेत. जवळपास दीड लाखांच्या फरकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येतील. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचाही विजय झालेला आहे. राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा तब्बल २ लाख जास्त मताधिक्य राहुल गांधी यांना मिळाले आहेत.
हेही वाचा : राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”
मोदींच्या मताधिक्यात घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवघ्या दीड लाखांच्या फरकाने विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात शेवटपर्यंच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, काही फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेत अजय राय यांचा पराभव केला. मागच्या वेळी मोदींना मिळालेल्या निवडणुकीच्या विजयाची तुलना केली असता यावेळी पंतप्रधान मोदी यांचं मताधिक्य घटलं आहे.
राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय
रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. याबरोबरच राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय झालेलं मताधिक्य आणि राहुल गांधी यांचं मताधिक्य यामध्ये मोठा फरक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राहुल गांधींना तब्बल दोन लाखांनी अधिक मताधिक्य मिळालं आहे.
मंत्री स्मृती इराणी यांचाही पराभव
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव झाला.