Premium

सेक्स व्हिडीओ प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा पराभवाच्या छायेत; मोदींची सभा ठरली निष्फळ

सेक्स टेप व्हिडीओमुळे चर्चेत आलेले जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा हे हासन लोकसभेतून पराभूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Prajwal Revanna and Narendra Modi
जेडीएसच्या प्रज्ज्वल रेवण्णांचा पराभव, मोठी पिछाडी

लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यामुळे चर्चेत आलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाचा हासन लोकसभेतून पराभव होत असल्याचे दिसत आहे. दुपारी १.३० वाजता प्रज्ज्वल रेवण्णा हे ४० हजार ५६८ मतांनी पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार श्रेयस एम. पटेल हे आघाडीवर आहेत. श्रेयस पटेल यांनी तब्बल ६ लाख ६१ हजार ५९९ एवढी मते घेतली आहेत. तर रेवण्णा यांना ६ लाख २१ हजार ०३१ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. त्यातही प्रज्ज्वल रेवण्णा यांना आघाडी घेता आली नाही, तर त्यांचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले जाते.

प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली होती. रेवण्णा यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी लोकांना केले होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल रोजी त्यांचा सेक्स व्हिडीओचा पेन ड्राईव्ह समोर आला. त्यामुळे ते अडचणीत आले. दुसऱ्याच दिवशी २८ एप्रिल रोजी त्यांनी कर्नाटकमधून पळ काढला आणि जर्मनी देशात आसरा घेतला.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Assembly Elections 2024 What is the type of home voting what are its benefits Nagpur news
गृहमतदान काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय ?
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर

मुंबईत ठाकरे गटाचे सर्व शिलेदार आघाडीवर, शिंदे गटाला कडवी लढत

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला ३१ मे रोजी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वल रेवण्णावर कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राइव्हही बाहेर आल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात १३ हजारांचा फरक, बारामतीचा गड राखण्यासाठी लेकी-सुनेत चढाओढ

नेमकं प्रकरण काय?

जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prajwal revanna lost from karnataka hassan lok sabha seat kvg

First published on: 04-06-2024 at 13:41 IST

संबंधित बातम्या