मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात (वायव्य मुंबई) एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार रवींद्र वायकर उभे आहेत. तर त्यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांनी आव्हान उभं केलं आहे. अमोल कीर्तिकरांचे वडील गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. गजानन कीर्तिकर हे वायव्य मुंबईचे विद्यमान खासदारदेखील आहेत. दरम्यान, कीर्तिकर पिता-पुत्राबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपाबरोबर (एकनाथ शिंदेंची शिवसेना) आहे. पण, निवडणूक झाल्यानंतर दुसरासुद्धा १०० टक्के भाजपाबरोबर जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो तुम्ही त्यांना मतदान का करताय?” वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांच्या प्रचारार्थ वंचितने मुंबईच्या गोरेगाव येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा